बेल्टमध्ये सापडून पणकोडोलीच्या तरुणाचा मृत्यू
By admin | Updated: November 1, 2014 21:48 IST
पणकोडोली : फाईव्ह स्टार (एमआयडीसी)मधील कंपनीतील कनव्हेटर बेल्टमध्ये सापडून गंभीर झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. महादेव कृष्णात कामाण्णा (वय २२, रा. पणकोडोली, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. मंगळवारपासून त्याच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
बेल्टमध्ये सापडून पणकोडोलीच्या तरुणाचा मृत्यू
पणकोडोली : फाईव्ह स्टार (एमआयडीसी)मधील कंपनीतील कनव्हेटर बेल्टमध्ये सापडून गंभीर झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. महादेव कृष्णात कामाण्णा (वय २२, रा. पणकोडोली, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. मंगळवारपासून त्याच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.याबाबतची माहिती अशी : महादेव कामाण्णा हा गेल्या चार वर्षांपासून फाईव्ह स्टार एमआयडीसीमधील साऊंड कास्टिंग या कंपनीत कामास होता. तो नेहमीप्रमाणे मंगळवारी कामास गेल्यावर कंपनीतील सॅन्ड वाहतूक करणार्या कनव्हेटर बेल्टमध्ये सापडला. या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्यास ताबडतोब कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. महादेवचा एक वर्षापूर्वीच गावातीलच मुलीबरोबर विवाह झाला होता. ----------फोटो मेल