Join us  

अनिल अंबानींसमोर नवी अडचण, ही कंपनी साथ सोडणार? एकेकाळी हवाई दलासाठी पुरवली होती राफेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 5:50 PM

अनिल अंबानींच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत अनिल अंबानींच्या बहुतांश कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत.

अनिल अंबानींच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत अनिल अंबानींच्या बहुतांश कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत. आता आणखी एक कंपनी अडचणीत आली आहे. अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स एरोस्ट्रक्चर लिमिटेड आणि डसॉल्ट एव्हिएशन यांच्यातील संयुक्त उपक्रम (JV) तुटण्याच्या मार्गावर असल्याचं वृत्त समोर आलंय. २०१७ मध्ये राफेल बनवणारी कंपनी डसॉल्टनं (Dassault Aviation) रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लिमिटेडला (Reliance Aerostructure Limited) आपला ऑफसेट पार्टनर बनवले होते. ही तीच कंपनी आहे जिच्याकडून भारतानं हवाई दलासाठी ३६ राफेल खरेदी केली होती. सध्याच्या आणि भविष्यातील ऑफसेट जबाबदाऱ्यांची पूर्तता करण्यासाठी नवीन भारतीय भागीदार शोधत असल्याचंही रिपोर्टमध्ये म्हटलंय.भागीदारी कायम ठेवण्यासाठी गुंतवणूकीच्या गरजा पूर्ण करण्यात असमर्थ असल्यानं संयुक्त उपक्रमातून हटण्याचा निर्णय डसॉल्टनं घेतल्यानं द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. दरम्यान, डसॉल्ट आता आपल्या वर्तमान आणि भविष्यातील ऑफसेट जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी नवीन भारतीय भागीदार शोधत असल्याचंही यात नमूद करण्यात आलं.

नागपूर मधील मिहान स्पेशल इकॉनॉमी सेक्टरमध्ये स्थित डसॉल्ट रिलायन्स एरोस्ट्रक्चर्स लिमिटेड (DRAL) सध्या राफेल विमानाचे कंपोनंट्स म्हणजेच इंजिनचे दरवाजे, एलिव्हन्स, विंडशील्ड्स, कॅनोपीज आणि इतर कंपोनंट्सचं असेंबलिंग करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स एरोस्ट्रक्चरच्या आणखी एका फ्रेंच कंपनी थेल्ससोबतच्या भागीदारीची स्थितीही अनिश्चित आहे. थेल्स आणि रिलायन्स डिफेन्स सिस्टम्स (TRDS) हा त्यांचा आणखी एक संयुक्त उपक्रम आहे. यामध्ये रिलायन्सची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मिहानमध्ये स्थित टीआरडीएस ही फ्रान्सबाहेरील सर्वोत्तम थेल्स फॅसिलिटी मानली जाते आणि ते राफेलचे कंपोनंट्स तयार करण्याचं काम करतात.

टॅग्स :अनिल अंबानीराफेल डील