Join us

म्हापसा परिसरात अंधाराचे साम्राज्य शक्य

By admin | Updated: September 29, 2014 21:47 IST

बार्देस, प्रकाश धुमाळ : गोवा सरकारने विजेबद्दल समाधानकारक सुविधा पुरविल्या नाही, तर येत्या काळात म्हापशाचे रहिवासी आणि आजूबाजूच्या लोकांना अंधाराचा सामना करावा लागणार आहे. म्हापसा वीज उपकेंद्रावर आणखी विजेचा प्रवाह वाढवत गेल्यास त्यावर जादा लोड येणार आहे. त्यासाठी सरकारने आतापासूनच पावले उचलणे गरजेचे आहे. म्हापसा वीज उपकेंद्रावरून म्हापसा आणि आजूबाजूच्या परिसरात राहतात त्या व्यतिरिक्त कामुर्ली, थिवी, कुचेली व थिवी औद्योगिक वसाहत आणि म्हापसामध्ये वाढते उद्योगधंदे, कारखाने इतर हल्लीच्या काळात यांचा उपकेंद्रावर अतिरिक्त ताण येतो. ज्याच्यावर चार पॉवर ट्रान्सफॉर्मर एकूण त्याची क्षमता 38 एम.व्ही.एम. आहे. म्हापसा उपकेंद्राकडून हडफडे उपकेंद्राला 33 केव्ही विजेची लाईन, तसेच 33 केव्ही भूमिगत वीजवाहिनी आणि पेडे व जिल्हा इस्पितळाला जाते. तसेच जवळ जवळ बारा आणि अनेक फिडर्स जवळच्य

बार्देस, प्रकाश धुमाळ : गोवा सरकारने विजेबद्दल समाधानकारक सुविधा पुरविल्या नाही, तर येत्या काळात म्हापशाचे रहिवासी आणि आजूबाजूच्या लोकांना अंधाराचा सामना करावा लागणार आहे. म्हापसा वीज उपकेंद्रावर आणखी विजेचा प्रवाह वाढवत गेल्यास त्यावर जादा लोड येणार आहे. त्यासाठी सरकारने आतापासूनच पावले उचलणे गरजेचे आहे. म्हापसा वीज उपकेंद्रावरून म्हापसा आणि आजूबाजूच्या परिसरात राहतात त्या व्यतिरिक्त कामुर्ली, थिवी, कुचेली व थिवी औद्योगिक वसाहत आणि म्हापसामध्ये वाढते उद्योगधंदे, कारखाने इतर हल्लीच्या काळात यांचा उपकेंद्रावर अतिरिक्त ताण येतो. ज्याच्यावर चार पॉवर ट्रान्सफॉर्मर एकूण त्याची क्षमता 38 एम.व्ही.एम. आहे. म्हापसा उपकेंद्राकडून हडफडे उपकेंद्राला 33 केव्ही विजेची लाईन, तसेच 33 केव्ही भूमिगत वीजवाहिनी आणि पेडे व जिल्हा इस्पितळाला जाते. तसेच जवळ जवळ बारा आणि अनेक फिडर्स जवळच्या खेडेगाव व म्हापसा परिसर याच उपकेंद्रावरून पुरविल्या आहेत. अधिकार्‍यांच्या अहवालानुसार 33/11 केव्ही कंट्रोलवरून म्हापसा उपकेंद्र हा सुसज्ज आहे आणि तेथे वाढविण्यासाठी पर्याय उरत नाही आणि हे असेच राहिले तर येत्या तीन वर्षांत याहूनही बिकट परिस्थिती ओढवणार आहे. जर नवीन वीज उपकेंद्र ताबडतोब हाती घेतली नाही तर कठीण परिस्थिती आहे. सध्या थिवी ते म्हापसापर्यंत भूमिगत वीजवाहिन्या घालण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे; पण त्याचेही काम गोगलगायीच्या गतीने चालू आहे. फक्त चाडेचार किमीच्या वीजवाहिन्या घालण्याचे काम पूर्ण झाले याची माहिती वीज खात्याला आहे. तरीसुद्धा एक विजेचे उपकेंद्र करासवाडा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये होणार आहे; पण त्याविषयी योग्य तसेच खात्रीलायक कुणी सांगू शकत नाही आणि दिले तर ते गुलदस्त्यातच राहणार आहे. विजेची समस्या जी आहे ती एकच समस्या नसून म्हापसा वीज कार्यालयाला वाहनांचा व लाईनमनचा तुटवडा आहे. कामाचा व्याप बघितला तर येथील कार्यालयाला आणखी तीस लाईनमनची अत्यंत गरज आहे. म्हापसा कार्यालयाने भाडेतत्त्वावर दोन गाड्या नियमित कामासाठी घेतल्या आहेत; पण गेल्या पाच महिन्यांत वाहनमालकांना भाडेप?ीवरील पैसे मिळाले नाही. एका कंत्राटदाराने आपले वाहन काढून घेतले असे समजते. दरम्यान, आमच्या प्रतिनिधीला माहिती देताना म्हापशातील एक ज्येष्ठ समाजसेवक मधुकर भोसले यांनी सरकारच्या या पावर योजनेवर प्रo्नचिन्ह उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, म्हापशात विजेची चणचण भासणार, हे नि?ित आहे. जोपर्यंत विजेचा पुरवठा करण्याची सोय नाही, तोपर्यंत दुसर्‍या राज्यातून वीज घेणे निर्थक असल्याचे भोसले म्हणाले. करासवाडा येथील वीज उपकेंद्राच्या नव्याने सुरू करण्यात येणार्‍या कामाचे अंदाजपत्रक सुरू करण्यात येत असल्याची माहितीही मिळाली आहे. तरीही जोपर्यंत सरकार त्वरित यावर उपाययोजना करत नाही किंवा ही समस्या सोडविण्यासाठी पावले उचलत नाही तर म्हापसेकरांना येत्या काही वर्षांत अंधारात राहावे लागणार आहे. फोटो : म्हापसा गणेशपुरी येथे असलेले वीज उपकेंद्राचे ट्रान्सफॉर्मर. (प्रकाश धुमाळ) 2409-एमएपी-05, 06