Join us

राणी सती मंदिरासमोर घाणीचे साम्राज्य मनपा ढिम्म; नागरिक त्रस्त

By admin | Updated: August 21, 2014 00:49 IST

अकोला : गोरक्षण रोडवरील प्रभाग क्र. ३२ मधील राणी सती मंदिरासमोर नालीचे सांडपाणी साचले असून, साफसफाईअभावी कचर्‍याचे ढीग लागले आहेत. यामुळे मंदिरात येणारे भाविक व परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदन परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला दिले.

अकोला : गोरक्षण रोडवरील प्रभाग क्र. ३२ मधील राणी सती मंदिरासमोर नालीचे सांडपाणी साचले असून, साफसफाईअभावी कचर्‍याचे ढीग लागले आहेत. यामुळे मंदिरात येणारे भाविक व परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदन परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला दिले. प्रभाग क्र. ३२ मध्ये राणी सती मंदिरासमोरील खुल्या भूखंडावर नालीचे घाण पाणी साचले आहे. या ठिकाणी साफसफाईच होत नसल्याने घाणीसह कचर्‍याचे ढीग साचले आहेत. हा प्रकार मागील दोन महिन्यांपासून कायम असून, साफसफाईअभावी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविक भक्तांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. मनपा प्रशासनाने त्वरित साफसफाई करण्याची विनंती परिसरातील नागरिकांनी केली आहे. निवेदनावर जयप्रकाश मुरमकार, गोपाल अग्रवाल, बंडू लेहनकार, लक्ष्मीकांत अग्रवाल, गिरीश अग्रवाल, अतुल शहा आदींसह नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.