Join us

सायकल चालवा अन् वीज तयार करा

By admin | Updated: November 28, 2015 00:03 IST

भारतीय वंशाचे उद्योगपती मनोज भार्गव यांनी एक अशी सायकल बनविली आहे की, त्यातून वीजनिर्मिती होऊ शकते. विशेषत: ग्रामीण भागातील लोकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल.

नवी दिल्ली : भारतीय वंशाचे उद्योगपती मनोज भार्गव यांनी एक अशी सायकल बनविली आहे की, त्यातून वीजनिर्मिती होऊ शकते. विशेषत: ग्रामीण भागातील लोकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल. एनआरआय मनोज भार्गव या अब्जाधीश उद्योगपतींनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, एका जागेवर उभी राहणारी ही सायकल वीजनिर्मिती करील. या सायकलचे पँडेल हे एका जनरेटरला जोडलेले असतील, त्या माध्यमातून बॅटरी चार्ज होऊ शकेल. या सायकलची किंमत १२ ते १५ हजार रुपये इतकी आहे. पुढील वर्षी मार्चमध्ये ही सायकल उपलब्ध होईल. एक तास पँडेल चालविल्यावर ग्रामीण भागात घरगुती कारणासाठी लागणारी २४ तासांसाठीची वीजनिर्मिती होऊ शकेल. या माध्यमातून ट्यूब लाईट, एक छोटा पंखा चालू शकेल, मोबाईल फोन चार्ज केला जाऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. साहजिकच, या विजेचे कोणतेही बिल देण्याची गरज नाही. यातून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. भार्गव यांनी सांगितले की, या सायकलबाबत एक वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली होती. सर्वात प्रथम या सायकलची विक्री उत्तराखंडात करण्यात येणार असल्याचे भार्गव यांनी सांगितले.