नवी दिल्ली : मुकेश अंबांनी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना १२0 जीबी ४जी डाटा मोफत देण्याची तयारी चालविली आहे. १ एप्रिलपासून कंपनीची पेड सेवा सुरू होईल. त्यात विविध योजनांखाली कंपनी वाढीव डाटा ग्राहकांना देणार आहे, असे समजते. सूत्रांनी सांगितले की, प्रीपेड प्लॅन असलेल्या ग्राहकांसाठी १४९ रुपये किमतीच्या रिचार्जवर २ जीबी अधिकचा डाटा मिळेल. त्याचप्रमाणे ३0३ रुपयांच्या प्लॅनवर दररोज ५ जीबी डाटा अधिक मिळेल. हा ५ जीबी डाटा मासिक २८ जीबी डाटाच्या व्यतिरिक्त असेल. ४९९ रुपये आणि त्यापेक्षा जास्तीच्या रिचार्जवर १0 जीबी डेटा मोफत मिळेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जिओ देणार ग्राहकांना १२0 जीबी डाटा मोफत
By admin | Updated: March 28, 2017 00:50 IST