Join us  

Crypto Market Crashed: क्रिप्टोकरन्सी बाजार हादरला; बिटकॉईन, इथेरियमसह सर्व चलनांमध्ये मोठी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 5:44 PM

Cryptocurrency market Fall: देशात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणारे लाखो लोक आहेत. बहुतांश क्रिप्टोकरन्सीच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे.

देशात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणारे लाखो लोक आहेत. अनेकांसाठी ते करोडपती बनण्याचे साधन झाले आहे. याच क्रिप्टोकरन्सीमध्ये आज मोठी खळबळ उडाली आहे. बहुतांश क्रिप्टोकरन्सीच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. जगातील प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनच्या किंमतीत 16 टक्क्यांची घसरण झाली आहे. दुसरीकडे इथेरियम, डॉजकॉईन आणि पोल्काडॉटसह सर्व क्रिप्टोकरन्सीमध्ये पडझड झाली आहे. 

जगातील सर्वात मोठी क्रिप्टो बिटकॉईन 16 टक्क्यांनी तुटली होती. यामुळे ही डिजिटल करन्सी 44000 डॉलरच्या खाली आली होती. रुपयांच्या हिशेबात शनिवारी बिटकॉईन 35 लाख रुपयांच्या खालच्या स्तरावर आली होती. काही वेळात अंशत: सुधारणा झाली. यामुळे याचा दर 39 लाखांवर पोहोचला. 

विशेष म्हणजे, बिटकॉइनने या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपला सर्वकालीन उच्चांक गाठला होता. 10 नोव्हेंबर रोजी, या डिजिटल चलनाने जबरदस्त तेजीमुळे $69,000 च्या स्तराला स्पर्श केला. परंतु या पातळीपर्यंत पोहोचल्यापासून, घसरण झाली आहे जी आतापर्यंत सुरू आहे. क्रिप्टो मार्केटमधील गुंतवणूकदारांचे दुसरे आवडते चलन इथरियमची किंमत शनिवारी १३.७३ टक्क्यांनी घसरून ३,९३४.८६ रुपये झाली. उल्लेखनीय म्हणजे, इथेरियमने नोव्हेंबरमध्येही त्याचा सर्वकालीन उच्चांक गाठला केला.

इतर प्रमुख डिजिटल चलनातील घसरणीची आकडेवारी पाहिल्यास, Binance Coin 12.59 टक्के, Polkadot 28.23 टक्के, Dodgecoin 19.42 टक्के, Shiba Inu 14.06 टक्के आणि Lite Coin 24.41 टक्क्यांनी घसरले आहे. याशिवाय कार्डानो, रिपल आणि युनिस्वॅपसह इतर चलने घसरणीसह व्यवहार करत आहेत.

टॅग्स :क्रिप्टोकरन्सी