Join us

कच्चा तेलाच्या किमती वाढल्या

By admin | Updated: December 27, 2014 01:41 IST

लिबियातील मुख्य खनिज तेल टर्मिनलांवर कट्टरपंथीय इस्लामी अतिरेक्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय

सिंगापूर : लिबियातील मुख्य खनिज तेल टर्मिनलांवर कट्टरपंथीय इस्लामी अतिरेक्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम होऊन कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. अमेरिकेतील वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या तेल दरात २८ सेंटची वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये करावयाच्या डिलिव्हरीसाठी या तेलाचे दर प्रति बॅरल ५६.१२ डॉलर असे झाले. ब्रेंट तेलाचे फेब्रुवारी डिलिव्हरीसाठीचे दर १३ सेंटनी वाढून प्रति बॅरल ६0.३७ डॉलर झाले. आशियाई बाजारात आज सौद्यांचे प्रमाण अत्यल्प दिसून आले. हाँगकाँग आणि आॅस्ट्रेलिया येथील मोठे तेल बाजार बंद होते. त्याचा परिणाम इतर बाजारांवर झाला. तेथील व्यवहार घटले. अमेरिका आणि युरोपीय देशांतील शेअर बाजार ‘बॉक्सिंग डे’च्या सुटीमुळे बंद होते. त्याचाही परिणाम तेल बाजारावर जाणवला.