Join us
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई बाजारात कच्च्या तेलाच्या किमती उतरल्या

By admin | Updated: October 24, 2014 03:41 IST

अमेरिकेचा बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट (डब्ल्यूटीआय) सकाळी ३0 सेंटनी कोसळला. त्याबरोबर तेथील कच्च्या तेलाचे भाव ८0.२२ डॉलर प्रति बॅरल झाले.

सिंगापूर : आशियाई बाजारात गुरुवारी कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या. चीनच्या वस्तू उत्पादन क्षेत्रात थोडीशी सुधारणा झाल्याच्या बातम्यांची अधिक चर्चा झाल्यामुळे कच्चे तेल उतरल्याच्या बातमीकडे दुर्लक्ष झाले, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.अमेरिकेचा बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट (डब्ल्यूटीआय) सकाळी ३0 सेंटनी कोसळला. त्याबरोबर तेथील कच्च्या तेलाचे भाव ८0.२२ डॉलर प्रति बॅरल झाले. ब्रेंट कच्चे तेल ३४ सेंटनी उतरून ८४.३७ डॉलर प्रति बॅरल झाले. विशेष म्हणजे हे दोन्ही निर्देशांक आधीच मंदीत आहेत. कित्येक वर्षांच्या नीचांकी पातळीवर ते चालत आहे. त्यातच अमेरिकी ऊर्जा विभागाने एक अहवाल जारी करून १७ आॅक्टोबर रोजी आपल्याकडील तेलसाठा ७१ लाख बॅरलवर पोहोचल्याचे जाहीर केले. त्यामुळे बुधवारी तेलाच्या किमती आणखी घसरल्या. अमेरिकेकडील तेलाचा साठा बाजारातील अंदाजापेक्षा दुपटीपेक्षाही जास्त निघाला. त्यामुळे ही घसरण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.अमेरिकेकडे अतिरिक्त तेलसाठा असल्याचे उघड झाल्यामुळे बाजारातील चिंता आणखी वाढल्या आहेत. तेलाच्या किमती आधीच घसरलेल्या आहेत. त्यामुळे आता या क्षेत्रात मंदीचा दबाव वाढेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकने तेल उत्पादन घटविणार नसल्याचे संकेत दिले आहेत. बाजारातील स्पर्धा पाहून किमतीत कपात करण्यास काही उत्पादक प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. (वृत्तसंस्था)