Join us

लाचखोर भूमी अभिलेख कर्मचारी जेरबंद -------------

By admin | Updated: September 1, 2014 22:45 IST

पारनेर (जि. अहमदनगर) : तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील दप्तरबंदचे कर्मचारी प्रकाश किसन वाघवणे यांना नकाशे व टिपणाच्या प्रती काढून देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना नगर येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी पकडले.

दरोडी येथील एका शेतकर्‍याला शेत जमीन गटाचे नकाशे व टिपणाच्या प्रती अभिलेख कक्षातून काढून देण्यासाठी वाघवणे यांनी तक्रारदाराकडे आठशे रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती सोमवारी पाचशे रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. (प्रतिनिधी)