Join us

चाकू घेऊन घरात घुसलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST

अकोला: चाकू घेऊन घरामध्ये घुसलेल्या आरोपीविरुद्ध सिव्हिल लाईन पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल केला.

अकोला: चाकू घेऊन घरामध्ये घुसलेल्या आरोपीविरुद्ध सिव्हिल लाईन पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल केला.
डॉ. आंबेडकरनगरात राहणारे सुधाकर सखाराम इंगळे (५५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुशील किशोर शहा हा बुधवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास हातात चाकू घेऊन त्यांच्या घरामध्ये घुसला आणि त्याने कुटुंबीयांना अश्लील शिवीगाळ करून चाकूचा धाक दाखवून भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे कुटुंबीय भयभीत झाले होते. इंगळे यांच्या तक्रारीनुसार सिव्हिल लाईन पोलिसांनी भादंवि कलम २९४, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
00000000000000000