Join us

क्रेडिट कार्डच्या आकाराचा जगातील सर्वात छोटा मोबाईल भारतात लाँच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2017 17:51 IST

ई-कॉमर्स वेबसाईट Yerha.com ने जगातील सर्वात छोटा फोन भारतात लाँच केला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - ई-कॉमर्स वेबसाईट Yerha.com ने जगातील सर्वात छोटा फोन भारतात लाँच केला आहे. या फोनला एलारी नॅनोफोन सी असं नाव देण्यात आलं आहे. एवढ्या छोट्या आकाराचा फोन जगात कुठेही नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. आजकाल बाजारात रोज नवनवे स्मार्टफोन येत असून दर दुस-या दिवसाला एक नवा स्मार्टफोन लाँच होतो असं म्हटंल तरी वावगं ठरणार नाही. त्यातच नव्याने लाँच झालेल्या या फोनमध्ये अत्यंत बेसिक स्पेसिफिकेशन्स असणार आहेत.
 
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नॅनोफोन जगातील सर्वात छोटा जीएसएम फोन आहे. विशेष म्हणजे या फोनचा आकार क्रेडिट कार्डइतका आहे. त्यामुळे एकवेळ खिशात जागा नसेल तर पाकिटाचही हा मोबाईल ठेवू शकतो. 
 
एलारी नॅनोफोनची किंमत 3940 रुपये इतकी असणार आहे. हा फोन तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. सिल्व्हर, रोज गोल्ड आणि ब्लॅक या तीन रंगाचा पर्याय मिळणार आहे.  कंपनीने हा मोबाईल फोन स्टायलिश, स्मार्ट आणि अल्ट्रा कॉम्पॅक्ट असल्याचा दावा केला आहे. 
 
"नॅनोफोन सी"चं वजन जवळपास 30 ग्रॅम आणि जाडी 7.6मिमी आहे. यामध्ये एक इंचाचा TFT डिस्प्ले असणार आहे, ज्याचं रिजोल्यूशन 128x96 पिक्सल आहे. आरटीओएसवर चालणार हा मोबाईल मीडियाटेकच्या MT6261D चिपसेटपासून बनवण्यात आला आहे. यामध्ये 32जीबी रॅम आणि 32एमबी मेमरी मिळणार आहे. एक्स्टर्नल मेमरी 32 जीबीपर्यंत वाढवू शकतो. 
हा एक ड्यूएल सिमकार्ड स्मार्टफोन असणार आहे. यामध्ये दोन मायक्रो सिमकार्ड्स वापरु शकतो. बॅटरी 280mAh आहे, जी चार तासांचा टॉकटाईम आणि चार तासांचा स्टँडबाय देते. 
 
या मोबाईल फोनमध्ये एमपी3 प्लेअर, व्हॉईस रेकॉर्डर, एफएम रेडिओ, मायक्रो युएसबी पोर्ट आणि 3.5मिमीचा ऑडिओ जॅक आहे. यामध्ये एक मॅजिक व्हॉईस फिचर आहे जो ब्लूट्यूथवर काम करतो. हे डिव्हाईस ब्ल्यूटूथच्या मदतीने अॅड्रॉईड आणि iOS डिव्हाईसशी कनेक्ट होतो. यानंतर युजर या फंक्शनच्या मदतीने मोबाईलवर येणा-या फोन कॉल्सचं उत्तर कनेक्टेड स्मार्टफोनवरुन देऊ शकतात.