Join us  

बाबा रामदेव यांना धक्का! पतंजलीला ठोठावला एक कोटींचा दंड

By देवेश फडके | Published: February 10, 2021 2:52 PM

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या पतंजलि पेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून पतंजलीला दंडप्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपकाएक कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई

नवी दिल्ली : केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या पतंजली पेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१८ चे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. (cpcb fined one crore rupees to baba ramdev firm patanjali)

मीडिया रिपोर्टनुसार, पतंजली पेय प्रायव्हेड लिमिटेडकडून प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१८ चे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने हा दंड ठोठावला आहे. याबाबत विचारले असता, पतंजलिचे प्रवक्ते एसके तिजारीवाला यांनी यासंदर्भात बोलण्यात नकार दिला. पतंजलीसह कोक, पेप्सिको आणि बिस्लेरी यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या अन्य कंपन्याची दंडात्मक रक्कम आणि अन्य बाबींविषयी माहिती देण्यात मंडळाने नकार दिल्याचे समजते. 

अदानींचा बंदर उद्योग तेजीत; तीन महिन्यांत १६ टक्क्यांच्या वाढीसह तब्बल १५७३ कोटींचा नफा

पतंजली पेय प्रायव्हेट लिमिटेडला फेब्रुवारी आणि ऑगस्ट २०२० मधील प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१८ च्या अंतर्गत नोंदणी अर्ज करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. मात्र, त्यावर अद्यापही कोणतेही उत्तर देण्यात आले नसल्याची माहिती केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आली. पास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१८ च्या कलम ९(१) नुसार नियम जाहीर झाल्यानंतर सहा महिन्यांत निर्माते नियोजित जबाबदारीनुसार कामे पूर्ण करतील. तसेच कलम ९ (२) नुसार मल्टिलेयर प्लास्टिक सॅशे, पाउच आणि पॅकेजिंग कलेक्शन यांची जबाबदारी उत्पादक, उत्पादने आयात करणाऱ्या कंपन्या आणि ब्रँड मालकांची असेल. मात्र, या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी पतंजलीसह अन्य कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

टाइम्स ऑफ इंडियानुसार, सप्टेंबर २०२० च्या दरम्यान बिस्लेरीचा प्लास्टिक कचरा २१ हजार ५०० टन होता. तर, पेप्सीको कंपनीचा प्लास्टिक कचरा ११ हजार १९४ टन होता. कोका कोला कंपनीचा प्लास्टिक कचरा ४ हजार ४१७ टन होता. त्यामुळे बिस्लेरी, पेप्सीको, कोका कोला यांना अनुक्रमे १०.७५ कोटी, ८.७ कोटी आणि ५०.६६ कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. 

 

टॅग्स :रामदेव बाबापतंजली