Join us  

दिवसाला ७ रुपयांचा खर्च, ८४ दिवसांची वैधता आणि रोज ३जीबी डेटा; पाहा जबरदस्त प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 5:03 PM

कंपनी यासह आणखी अनेक बेनिफिट्स ऑफर करत आहे.

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL), आपल्या ग्राहकांना अनेक प्रीपेड मोबाईल प्लॅन आणि पॅक ऑफर करत आहे. BSNL सध्या भारतभर मर्यादित प्रमाणात आपल्या ग्राहकांना 2G, 3G आणि 4G सेवा ऑफर करत आहे.  बीएसएनएलकडे त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स आहेत. जर तुम्ही मोबाईलवर अमर्यादित नाईट डेटा ऑफर करणारा प्लॅन शोधत असाल, तर BSNL कडे एक आकर्षक आणि लोकप्रिय रिचार्ज पर्याय आहे. वास्तविक, आम्ही बीएसएनएलच्या 599 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल बोलत आहोत. 599 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

कंपनी 599 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 3 जीबी हायस्पीड डेटा आणि दररोज 100 एसएमएस ऑफर करते. या प्लॅनसह ग्राहकांना 84 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनचा दररोजचा खर्ज जवळपास 7 रुपये आहे.

आणखी काय मिळतं?डेटा, व्हॉईस आणि एसएमएस बेनिफिट्ससह कंपनी 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत BSNL ट्यून, झिंग म्युझिक, ॲस्ट्रोटेल आणि गेमऑन सेवांचा लाभही घेता येईल.

महत्त्वाचं म्हणजे जर ग्राहकाने प्लॅनसह दुसऱ्या किंवा तिसऱ्यांदा रिचार्ज केला तर, अनयूझ्ड व्हॅलिडिटी जमा होईल. सेगमेंटमध्ये BSNL कडून आणखी एक ऑफर म्हणजे 84 दिवसांची वैधता असलेला 769 रुपयांचा प्लॅनदेखील आहे. BSNL प्लॅनसह अमर्यादित कॉल, डेटा, मनोरंजन आणि गेम ऑफर करते. तुम्ही OTT सह पर्याय शोधत असल्यास, तुम्ही BSNL 769 प्रीपेड प्लॅनसह रिचार्ज करू शकता.

टॅग्स :बीएसएनएल