Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘कॉर्पोरेट कर कमी केल्यास भारतात गुंतवणूक वाढेल’

By admin | Updated: March 12, 2015 00:15 IST

कॉर्पोरेट कर येत्या चार वर्षांत ३० वरून २५ टक्के केला की आसियान देशांमध्ये भारत स्पर्धक देश बनेल व आणखी गुंतवणूक आकर्षित करील,

चेन्नई : कॉर्पोरेट कर येत्या चार वर्षांत ३० वरून २५ टक्के केला की आसियान देशांमध्ये भारत स्पर्धक देश बनेल व आणखी गुंतवणूक आकर्षित करील, असे महसूल सचिव शशिकांत दास यांनी बुधवारी येथे सांगितले. आसियान देशांमध्ये कॉर्पोरेट कर २५ किंवा त्यापेक्षा कमी आहे. उद्योग मंडळ सीआयआयच्या चर्चासत्रात बोलताना दास म्हणाले की, कॉर्पोरेट करांमध्ये कपात केल्यास भारत चांगला स्पर्धक देश बनेल व त्यामुळे देशी आणि परदेशी गुंतवणूकदार भारताला पसंती देतील. कॉर्पोरेट कर कमी करणे हे एका वर्षात होणारे काम नाही. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५-२०१६ च्या अर्थसंकल्पात कॉर्पोरेट कर २५ टक्के करण्याची घोषणा केली असून सध्या हा कर ३० टक्के आहे. पुढील वर्षापासून हा निर्णय लागू होईल. चार वर्षांत तो पूर्ण होईल.