Join us  

Coronavirus : कोरोनाचे आर्थिक परिणाम टाळण्यासाठी जगभर प्रयत्न; जागतिक बँका सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 12:27 AM

coronavirus : देशातील जवळपास सर्वच राज्यात लॉकडाऊ न आणि अनेक निर्बंध लादण्यात आल्याने उद्योगधंदे बंद पडले आहेत.

नवी दिल्ली : करोना विषाणुच्या वाढत्या संसर्गामुळे जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत येत चालली असून, तिला मंदीतून बाहेर काढण्यासाठी सर्व देशांतील मध्यवर्ती बँकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. भारताच्या रिझर्व्ह बँकेचाही त्यात समावेश आहे. सतत कोसळणारा शेअर बाजार, सोने-चांदीच्या दरात होणारे मोठे चढ-उतार आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली प्रचंड घसरण या परिस्थितीकडे रिझर्व्ह बँक लक्ष ठेवून आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यात लॉकडाऊ न आणि अनेक निर्बंध लादण्यात आल्याने उद्योगधंदे बंद पडले आहेत.सद्यस्थितीत विविध क्षेत्रांना काही सवलती जाहीर करता येतील का, यांचाही विचार सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. कोलमडून पडत चाललेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागणार आहेत. ती लगेच सुधारेल, अशी शक्यता नाही. पण सध्याच्या स्थितीचा गरीब व सामान्यांना कमीत कमी फटका बसावा, यासाठी काय करता येईल, याचा विचार सुरू असल्याचे अधिकाºयाने सांगितले.आरबीआय-सरकार सल्लामसलतवेदांता समूहाने म्हटले की, या संकटाच्या काळात कंपनी कोणालाही कामावरून काढणार नाही. तसेच कोणाचे वेतनही कापणार नाही. टाटा समूहानेही वेतन न कापण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भारतात हिंदुस्तान युनिलिव्हरने सर्वांत आधी १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.मंदीच्या सावटाखाली असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे अधिकच फटका बसला आहे. या परिस्थितीत सुधारणा व्हावी, यासाठी कोणकोणत्या उपययोजना करता येतील, यावर रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार सल्लामसलत करीत आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याबँक