Join us  

coronavirus: शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स ८८६ अंकांनी खाली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 6:57 AM

गुरूवारी मुंबई शेअर बाजाराची सुरूवात घसरणीनेच झाली. संवेदनशील निर्देशांक सुमारे ९५५ अंश खाली गेला होता.

मुंबई : सरकारने उद्योगांसाठी जाहीर केलेले पॅकेज फारसे प्रभावी नसल्याचा बाजाराचा झालेला समज आणि जगभरातील निराशाजनक वातावरण यामुळे गुंतवणुकदारांमध्ये चलबिचल सुरू होती. परिणामी मुंबईशेअर बाजारात मोठी घसरण पहावयास मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशिल निर्देशांक ८८६ अंशांनी घसरला. निफ्टीने ९१५० अंशांची पातळी सोडली.गुरूवारी मुंबई शेअर बाजाराची सुरूवात घसरणीनेच झाली. संवेदनशील निर्देशांक सुमारे ९५५ अंश खाली गेला होता. त्यानंतर काही प्रमाणात त्यामध्ये वाढ झाली. मात्र बाजार बंद होतानाही हा निर्देशांक ८८५.७२ अंश म्हणजेच २.७७ टक्के खाली येऊन ३११२२.८९ अंशांवर बंद झाला.नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्येही मोठ्या प्रमाणावर निराशाजनक वातावरण दिसून आले. येथील निर्देशांक (निफ्टी) २४०.८० म्हणजेच २.५७ टक्के घसरला. बाजार बंद होताना निफ्टी ९१४२.७५ अंशांवर बंद झाला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही घसरण पहावयास मिळाली....या कारणांनी बाजार आला खालीअर्थमंत्र्यांनी दिलेल्या पॅकेजनंतर बाजारात चांगली वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत असतानाच गुरूवारी बाजारात मोठी घसरण झाली. दिलेले पॅकेज पुरेसे नसून त्यामुळे अर्थव्यवस्था फारशी सावरली जाणार नसल्याचा सूर बाजारात दिसून आला. अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये रक्कम कुठून येणार याबाबत स्पष्टता नसल्याने खरच एवढी रक्कम मिळणार का? याबाबत शंका व्यक्त केली जात होती.च्घोषित उपाययोजनांमुळे तातडीने कोणताही बदल दिसणार नसून त्यामुळे अर्थव्यवस्थेला फारशी गती मिळू शकणार नसल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारताचा पतदर्जा आणखी घसरण्याची भीती असून त्यासाठी कोणतीही उपाययोजना नसल्याचे मत व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे दिलेली मदत कमी स्वरूपात असल्याचे गुंतवणुकदारांचे मत झाल्याने बाजार घसरला.आशियातील शेअर बाजारांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबद्दल दिलेल्या इशाऱ्याने निराशाजनक वातावरण राहिले. त्याचप्रमाणे फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी अमेरिकन अर्थव्यवस्था ही अतिशय दोलायमान राहण्याची व्यक्त केलेली भीती गुंतवणुकदारांना बाजारापासून दूर घेऊन गेलेली दिसली.पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची सविस्तर घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. मात्र यामधील जाहीर झालेली रक्कम ही कमी असून त्यामुळे अर्थव्यवस्थेला ताबडतोब चालना मिळण्याची शक्यता नसल्याचे मत गुंतवणुकदारांचे झाले. यामुळे बाजारात निराशाजनक वातावरण राहून बाजार खाली आला. \ 

टॅग्स :मुंबईशेअर बाजार