Join us  

Coronavirus: लॉकडाऊन काळात एकमेव भारतीय उद्योजकाच्या संपत्तीत वाढ; कोण आहेत ‘हे’ जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 3:31 PM

मोठमोठ्या उद्योजकांना कोरोना व्हायरसमुळे आर्थिक नुकसान सहन करावं लागलंय, मात्र देशातील १२ उद्योजकांमधील एक उद्योजक असे आहेत

ठळक मुद्दे 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये लोकांच्या पॅनिक बायिंगने फायदा केला. कोरोनाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे अनेक उद्योजकांच्या संपत्तीत घट झाली पण दमानी अपवाद ठरले

नवी दिल्ली – सध्या जगभरात सगळीकडे कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशांनी लॉकडाऊन केले आहे. यामुळे अनेकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. जगातील १०० श्रीमंतांच्या यादीत फक्त मुकेश अंबानी यांचं नाव आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही २८ टक्क्यांची घट झाली आहे. आठव्या स्थानावरुन मुकेश अंबानी यांची १७ व्या स्थानावर घसरण झाली आहे.

मोठमोठ्या उद्योजकांना कोरोना व्हायरसमुळे आर्थिक नुकसान सहन करावं लागलंय, मात्र देशातील १२ उद्योजकांमधील एक उद्योजक असे आहेत ज्यांच्यावर कोरोनाचा कोणताही आर्थिक मार बसला नाही. या उद्योजकाचे नाव राधाकृष्ण दमानी असं आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्स ज्या भारतीय श्रीमंताची संपत्तीवर लक्ष ठेवतो त्यातील एक उद्योजक दमानी  हेदेखील आहेत.

दमानी एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडचं नियंत्रण करतात. डी मार्ट एव्हेन्यूच्या माध्यमातून होणारी कमाई दमानीच्या निव्वळ संपत्तीच्या बरोबरीची असते. यावर्षी कंपनीच्या शेअर्सच्या किंमती सुमारे 18% वाढल्या आहेत तर दमानींची संपत्ती 5% ने वाढून 10.2 अब्ज डॉलर झाली आहे.

दमानीची संपत्ती का वाढली?

संपूर्ण देशात लॉकडाऊन दरम्यान, दमानीची वाढती संपत्ती संपूर्ण श्रेय साठवणुकीला जातं. कोरोनाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे आणि देशात लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोक घरात खाद्यपदार्थ साठवत आहेत. पूर्वी खूप साठा होता, ज्याचा फायदा दमानीला झाला. दमानी मुंबईत एका खोलीच्या अपार्टमेंटमध्ये राहत होते. मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांच्यासारख्या नामांकित आणि बड्या उद्योजकांना शेअर मार्गाने मोठा तोटा सहन करावा लागला आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती 28 टक्क्यांनी कमी झाली. अशातच दमानी यांच्या सुपरमार्केट चेनने 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये लोकांच्या पॅनिक बायिंगने फायदा केला. लॉकडाऊनचा परिणाम राधाकृष्ण यांच्यावर झाला नाही. त्यांची सुपरमार्केटची साखळी त्यांच्यासाठी फायद्याची ठरली.

कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या त्याच परिस्थितीत डी-मार्टच्या प्रतिस्पर्ध्यांना काही फायदा झाला नाही. फ्यूचर ग्रुप, देशातील दुसरी सर्वात मोठी रिटेल साखळी ज्यांचे देशभरात 1300 स्टोअर्स आहेत. परंतु यावर्षी त्याच्या किरकोळ युनिटच्या समभागात 80% घट झाली. मात्र लॉकडाऊन वाढल्यास दमानी आणि एव्हेन्यू सुपरमार्ट्सचा माल खाली होण्यास सुरुवात होईल. दमानी स्टोअरमध्ये रॅक पुन्हा भरण्याचे व्यवस्थापन करीत आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या