Join us  

CoronaVirus : खूशखबर! 4 सरकारी बँकांचं कर्ज झालं स्वस्त, कमी होणार घराचा अन् कारचा EMI

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 2:12 PM

या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दंडाच्या स्वरूपात व्याज लागणार नाही, असे दास यांनी स्पष्ट केले होते.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपूर्वीच आरबीआयनं रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेपो रेटमध्ये कपात केली आहे. रेपो रेट ७५ बेसिस पॉइंटने कमी करून ४.४% करण्यात आला असून, रिव्हर्स रेपो दरातही ९० बेसिस पॉईंटने कमी करून ४ % करण्यात आला आहे. कर्जावरील व्याजदर ५.१५ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांवर आला असून, अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजदरात घट करण्यात आली आहे. १ मार्च रोजी असलेल्या सर्व टर्म लोनचे तीन महिन्यांचे मासिक हप्ते पुढे ढकलण्याचे अधिकार सर्व बँका तसेच नॉनबँकिंग फायनान्स कंपन्या यांना देण्यात आले आहेत. याबाबतचा निर्णय बँका तसेच कंपन्यांवर सोडण्यात आला होता. या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दंडाच्या स्वरूपात व्याज लागणार नाही, असे दास यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता चार सरकारी बँकांनी व्याजदर घटवले आहेत. सर्वप्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली. त्यानंतर बँक ऑफ इंडिया (बीओआय), बँक ऑफ बडोदा (बीओबी)ने कर्जाचे दर कमी केले. आता आणखी एक सरकारी बँक युनियन बँक ऑफ इंडियाने (यूबीआय) कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या रेपो दराशी संबंधित कर्जाचे व्याजदर ०.७५ टक्क्यांनी कमी केले. कर्जाचे दर कमी झाल्याने आता या बँकांकडून गृह कर्ज किंवा वाहन कर्ज घेणे स्वस्त होईल.युनियन बँक ऑफ इंडियासार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाने सोमवारी आपल्या रेपो रेटची संबंधित कर्जाचे व्याजदर ०.७५ टक्क्यांनी कमी केले. यानंतर बँकेचा कर्जाचा व्याजदर ७.२० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आरबीआयच्या रेपो दरात ०.७५ टक्के कपात करण्याचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे. सूक्ष्म, लघू आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगासाठी कर्ज घेणाऱ्यांपासून घर, वाहन आणि वैयक्तिक कर्जांवर हे व्याज दर लागू होतील, असे बँकेने निवेदनात म्हटले आहे. हा व्याजदर आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेच्या ग्राहकांना तितक्या प्रमाणात लागू होणार आहे, कारण युनियन बँक ऑफ इंडियामध्ये या दोन्ही बँकांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. SBIआरबीआयच्या घोषणेनंतर एसबीआयने आपल्या ग्राहकांना रेपो दर कमी करून फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. एसबीआयने एक्सटर्नल बेंचमार्क कर्जदर (ईबीआर) आणि रेपो लिंक्ड लेन्डिंग रेट (आरएलएलआर)मध्ये ०.७५ टक्क्यांनी कपात केली आहे. ही कपात १ एप्रिल २०२० पासून लागू होईल. यानंतर आता एसबीआयचा वार्षिक ईबीआर ७.८० टक्क्यांवरून ७.०५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आरएलएलआरचा दरही वार्षिक ७.४० टक्क्यांवरून ६.६५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. एसबीआयने दोन्ही कर्जदरात केलेल्या कपातीनंतर या बँकेकडून गृहकर्ज घेणार्‍या ग्राहकांना ३० वर्षांच्या कालावधीसाठी गृहकर्ज ईएमआयमध्ये प्रतिलाख ५२ रुपयांची कपात मिळेल. अशा परिस्थितीत जर तुम्ही एसबीआयकडून ३० वर्षांसाठी ३० लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल तर तुमची ईएमआय १५६० रुपयांनी कमी होईल.बँक ऑफ इंडियाबँक ऑफ इंडियाने रविवारी आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. रिझर्व्ह बँक (आरबीआय)ने कमी केलेल्या पॉलिसी रेटचा पूर्ण लाभ ग्राहकांना देण्याचा निर्णय बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. BOIने रविवारी एक्सटर्नल बेंचमार्क कर्जाचे दर ७५ बेसिस पॉईंट म्हणजेच ०.७५ टक्क्यांनी कमी केले आहेत. या कपातीनंतर एक्सटर्नल बेंचमार्क कर्जदर ७.२५ टक्क्यांपर्यंत खाली आला. लेंडर्स एक्सटर्नल बेंचमार्क कर्जदर आरबीआयच्या रेपो रेटशी जोडलेला आहे. व्याजदरामधील ही कपात १ एप्रिलपासून लागू होणार आहे.बँक ऑफ बडोदाBOBने सोमवारी बडोदा रेपो लिंक्ड लेन्डिंग रेट (बीआरएलएलआर)मध्ये ७५ बेसिस म्हणजेच ०.७५ टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली. या वजावटीनंतर बँकेच्या किरकोळ कर्जे, वैयक्तिक आणि सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) व्याजदर ७.२५ टक्क्यांवर आले आहेत. नवीन दर २८ मार्चपासून लागू झाले आहेत. नवीन ग्राहकांना त्वरित लाभ मिळतील, तर विद्यमान ग्राहकांनाही याचा फायदा पोहोचणार आहे. 

टॅग्स :बँक ऑफ इंडियाभारतीय रिझर्व्ह बँक