Join us  

कोरोनामुळे घरूनच काम करण्याचा ट्विटर कर्मचाऱ्यांना सल्ला, जगभरात अंमल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 3:41 AM

कोरोना विषाणूचा संसर्ग जगातील ६0 हून अधिक देशांत झाला असल्याने ट्विटरने आपल्या पाच हजार कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येता घरूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग जगातील ६0 हून अधिक देशांत झाला असल्याने ट्विटरने आपल्या पाच हजार कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येता घरूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. ही माहिती ट्विटरनेच दिली आहे. याखेरीज कंपनीने कर्मचारी, अधिकारी यांना तूर्त कुठेही परदेशांत कामासाठी न पाठविण्याचाही निर्णय घेतला आहे. या महिन्यात टेक्सासमध्ये होणाºया परिषदेतही ट्विटरचे प्रतिनिधी सहभागी होणार नाहीत. इतर देशांतील कंपन्यांनीसुद्धा कर्मचाºयांना कार्यालयात न येता घरी बसूनच काम करावे, असे सांगितले आहे. परदेशांत ही पद्धत रूढ आहे. जपान, हाँगकाँग, दक्षिण कोरिया येथील कर्मचाºयांना तर ट्विटरने कार्यालयांत येऊच नका, असे स्पष्ट सांगितले आहे. मात्र अन्यत्र आमची कार्यालये सुरू राहतील.एटीअँडटी, सिटीग्रुप आदी कंपन्यांनी कर्मचारी व अधिकाºयांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर, विशेषत: आशियाई देशांत जाण्यावर निर्बंध घातले आहेत. फेसबुक व अल्फाबेटच्या गुगलने अमेरिकेत होणारी परिषद रद्दच केली आहे. फेसबुकनेही काही देशांत कर्मचाºयांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.स्क्वेअर इनकॉर्पोरेट या कंपनीनेही कर्मचाºयांना घरात बसूनच काम करा, असे सांगितले आहे. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अ‍ॅरॉन झॉमोस्ट यांनी सांगितले की, घरी बसूनच कर्मचाºयांनी काम करावे, असे आमचे सध्याचे धोरण आहे.

टॅग्स :कोरोना