Join us  

Coroanvirus: सात वर्षापूर्वी सुरू झालेल्या 'कोरोना' दुकानाला ग्राहकांची भरभरून गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 3:55 AM

मागील वर्षाच्या उत्तरार्धामध्ये चीनमध्ये उद‌्भवलेल्या एका रोगाला कोरोना असे नाव दिले गेले. थोड्याच काळात या रोगाने जागतिक साथीचे रूप घेतले आणि जगभरामध्ये कोरोना हे नाव प्रसिद्धीला आले.

तिरुवनंतपुरम‌ : केरळच्या कोट्टायम शहरामध्ये सात वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कोरोना नावाच्या दुकानाला जागतिक साथीमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली असून, आता या दुकानामध्ये ग्राहकांची गर्दी वाढत असलेली दिसून येत आहे. कोट्टायम शहराच्या कलाथिपटी भागामध्ये केरळातील एका व्यावसायिक जॅार्ज यांनी झाडे, कुंड्या आणि घराच्या अंतर्गत सजावटींच्या वस्तूंचे दुकान सुरू केले. या दुकानाला त्यांनी नाव दिले कोरोना. त्यावेळी या नावाबाबत कोणीच फारशी उत्सुकता दर्शविली नाही.

मागील वर्षाच्या उत्तरार्धामध्ये चीनमध्ये उद‌्भवलेल्या एका रोगाला कोरोना असे नाव दिले गेले. थोड्याच काळात या रोगाने जागतिक साथीचे रूप घेतले आणि जगभरामध्ये कोरोना हे नाव प्रसिद्धीला आले. सात वर्षांपासून कोट्टायममध्ये सुरू असलेल्या कोरोना दुकानाकडे आता ग्राहक अधिकाधिक संख्येने आकर्षित होत असून, दुकानामध्ये गर्दी वाढत असल्याचे संचालक जॉर्ज यांनी सांगितले. कोरोनाच्या जागतिक साथीनंतर माझ्या व्यवसायामध्ये मोठी वाढ झाल्याचे जॉर्ज यांनी सांगितले.  

कोरोना म्हणजे मुकुटकोरोना म्हणजे मुकुट घराची अंतर्गत सजावट करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या या दुकानाला कोरोना हे नाव  का दिले याबाबत जॉर्ज म्हणाले की, हा लॅटिन शब्द आहे. त्याचा अर्थ होतो मुकुट. घराचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्यासाठी अंतर्गत सजावटीच्या वस्तू घेतल्या जातात. म्हणून हे नाव ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या