Join us  

रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर बँकांविरुद्ध तक्रारीची सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 3:40 AM

रिझर्व्ह बँकेने आपल्या वेबसाईटवर तक्रार व्यवस्थापन यंत्रणा (सीएमएस) सुरू केली आहे.

मुंबई - रिझर्व्ह बँकेने आपल्या वेबसाईटवर तक्रार व्यवस्थापन यंत्रणा (सीएमएस) सुरू केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील सर्व बँका आणि वित्तीय संस्था यांच्या विरोधातील तक्रारी या यंत्रणेवर केल्या जाऊ शकतील.वेबसाईटवर तक्रारीचा तपशील दाखल केल्यानंतर ती तक्रार योग्य लोकपालाकडे (ओंबुडसमॅन) अथवा रिझर्व्ह बँकेच्या विभागीय कार्यालयाकडे पाठविली जाईल. तेथे या तक्रारीचा निपटारा केला जाईल.या सुविधेमुळे तक्रार निवारण प्रक्रियेच्या पारदर्शकतेत सुधारणा होईल. तक्रारदाराला स्व-निर्मित (आॅटो-जनरेटेड) पोहोचपावती मिळेल. आपल्या तक्रारीचा मागोवा त्यास ठेवता येईल, तसेच लोकपालाच्या निर्णयाविरुद्ध आॅनलाईन अपीलही करता येईल. तक्रार निवारण व्यवस्थेवर आपल्या अनुभवाबाबतची प्रतिक्रियाही तक्रारकर्ता नोंदवू शकेल.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक