Join us

राष्ट्रीय विद्युत योजनेचे काम सुरू

By admin | Updated: September 20, 2015 22:59 IST

आठवड्यातील सातही दिवस सर्वांना २४ तास वीज उपलब्ध करून देण्याच्या

नवी दिल्ली : आठवड्यातील सातही दिवस सर्वांना २४ तास वीज उपलब्ध करून देण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षी ‘उद्दिष्टाला’ चालना देण्यासाठी सरकारने पाच वर्षांसाठी राष्ट्रीय वीज योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे.राष्ट्रीय वीज योजना तयार करण्याचे काम एका समितीकडे सोपविण्यात आले आहे. या समितीने या क्षेत्रासाठी विविध पैलूंवर विचार करण्यासाठी ११ उपसमित्या गठित केल्या आहेत. सरकारच्या एका आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. त्यातील उपसमिती-१ ‘सर्वांना वीज’ या उद्दिष्टाखाली ग्राहकांना उचित दरात विश्वसनीय व दर्जेदार वीज उपलब्ध करून देण्यासाठी उपाय सुचवेल, तसेच ही समिती देशात विजेची नेमकी किती मागणी आहे, याचेही आकलन करील. याशिवाय अन्य एक समिती उपलब्ध वेळ आणि विजेची आवश्यकता यावर विचार करील. विशेषत: २०१७ ते २०२२ आणि २०२२ ते २०२७ या काळात लागणाऱ्या विजेचे आकलन ही समिती करील. (लोकमत न्यूज नेटवर्क)