Join us

सराफ्यात तेजीचा सिलसिला कायम

By admin | Updated: January 21, 2015 00:06 IST

दिल्लीच्या सराफ्यात मंगळवारी सोन्याचा भाव आणखी १०० रुपयांनी वाढून २८,१८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. सोन्याच्या भावात सलग चौथ्या दिवशी तेजी नोंदली गेली.

नवी दिल्ली : आभूषण विक्रेत्यांची लग्नसराईच्या काळातली मागणी व जागतिक बाजारातील मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफ्यात मंगळवारी सोन्याचा भाव आणखी १०० रुपयांनी वाढून २८,१८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. सोन्याच्या भावात सलग चौथ्या दिवशी तेजी नोंदली गेली.औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांच्या मागणीत वाढ झाल्याने चांदीचा भावही १०० रुपयांनी वधारून ३९,२०० रुपये प्रतिकिलो झाला.जागतिक पातळीवर लंडन येथे सुरुवातीच्या व्यवहारात सोने ०.८३ टक्क्यांच्या तेजीसह १,२९०.९० डॉलर प्रतिऔंस व चांदीचा भाव ०.७९ टक्क्याने वाढून १७.९२ डॉलर प्रतिऔंस झाला. तयार चांदीचा भाव १०० रुपयांच्या तेजीसह ३९,२०० रुपये प्रतिकिलो व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ११० रुपयांनी वाढून ३९,१८० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १,००० रुपयांनी वधारून खरेदीकरिता ६४,००० रुपये व विक्रीसाठी ६५,००० रुपये प्रतिशेकड्यावर राहिला.४राजधानी दिल्लीच्या बाजारात ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १०० रुपयांनी वाढून अनुक्रमे २८,१८० रुपये व २७,९८० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. गेल्या तीन सत्रांत सोन्याच्या भावात ७६० रुपयांची वाढ झाली आहे. आठ ग्रॅम गिन्नीचा भावही १०० रुपयांनी वाढून २४,००० रुपयांवर राहिला.