Join us

सेन्सेक्सची सलग घसरण

By admin | Updated: February 4, 2015 01:39 IST

रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे निराश झालेल्या शेअर बाजारात मंगळवारी घसरण पाहायला मिळाली.

मुंबई : रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे निराश झालेल्या शेअर बाजारात मंगळवारी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १२२.१३ अंकांनी कोसळून २९,000.१४ अंकांवर बंद झाला. याबरोबर सेन्सेक्सने दोन आठवड्यांचा नीचांक गाठला आहे. सेन्सेक्स सलग सत्रांत घसरला आहे. खरे म्हणजे सकाळी तो तेजीसह २९,२५३.0६ अंकांवर उघडला होता. रिझर्व्ह बँकेचा पतधोरण आढावा आल्यानंतर मात्र तो नकारात्मक झोनमध्ये गेला. घसरण इतकी गतिमान होती की, लवकरच तो २९ हजारांच्या खाली गेला. सत्र अखेरीस २९,000.४१ अंकांवर बंद झाला. १२२.१३ अंकांची अथवा 0.४२ टक्क्यांची घट त्याने नोंदविली. काही ब्ल्यूचिप कंपन्यांनी सेन्सेक्सला थोडासा आधार दिला. अन्यथा तो २९ हजारांच्या खाली बंद झाला असता. (वृत्तसंस्था)