ंअमोल भूमकर यांचा काँग्रेस प्रवेश
By admin | Updated: October 4, 2014 08:32 IST
वैराग- येथील सोपल गटाचे खंदे सर्मथक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. धन्यकुमार भूमकर यांचे नातू अमोल आण्णासाहेब भूमकर, विद्यामंदीर संस्थेचे भूषण जयंत भूमकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस आय पक्षात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये वैराग भागात जबरदस्त फूट पडली आहे.
ंअमोल भूमकर यांचा काँग्रेस प्रवेश
वैराग- येथील सोपल गटाचे खंदे सर्मथक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. धन्यकुमार भूमकर यांचे नातू अमोल आण्णासाहेब भूमकर, विद्यामंदीर संस्थेचे भूषण जयंत भूमकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस आय पक्षात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये वैराग भागात जबरदस्त फूट पडली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, बार्शी विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार सुधीर गाढवे यांच्या उपस्थितीमध्ये सोलापुरात जनवात्सल्य येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. वैरागचे भूमकर परिवारातील कै. धन्यकुमार भूमकर व आण्णासाहेब भूमकर काँग्रेसचे क?र होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने अमोल भूमकर यांच्यावर जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविली आहे. भूमकर गटाच्या पक्षांतरामुळे सोपल गटाला हादरा बसला आहे.