Join us
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचार्‍यांच्या बदल्यांबाबत संभ्रम (फक्त ग्रामीण साठी)

By admin | Updated: June 4, 2015 00:34 IST

अंतर्गत बदल्यांचा सपाटा सुरूच

अंतर्गत बदल्यांचा सपाटा सुरूचनाशिक : जिल्हा परिषदेत कर्मचारी बदल्यांची कार्यवाही करण्यात आल्यानंतर त्यातील पाच संवर्गातील बदल्या स्थगित करणे प्रशासनाला भाग पडले आहे. मात्र सर्वच कर्मचार्‍यांच्या बदल्या रद्द झाल्याची चर्चा कर्मचार्‍यांमध्ये पसरली असली, तरी अद्याप त्याबाबत अधिकृत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.विशेष म्हणजे, एका विभागातून बदली करताना पुन्हा त्याच विभागात त्या कर्मचार्‍याची बदली करायची नाही, असा दंडक घालणार्‍या जिल्हा परिषद प्रशासनाने मात्र काही बदल्यांमध्ये या दंडकाला मोडता घालत सामान्य प्रशासन, शिक्षण विभागासह अन्य काही विभागांत आधी त्या विभागात काम केलेल्या कर्मचार्‍यांना पुन्हा त्याच विभागात नियुक्ती दिल्याची चर्चा आहे. पेसा कायद्याअंतर्गत अनुसूचित जमाती संवर्गातील कर्मचार्‍यांना त्यांच्या सोयीनुसार व त्यांच्या मूळ गावीच नियुक्ती देण्याचा ५ मार्चचा शासन निर्णय असून, त्या निर्णयाच्या आधारेच आधी करण्यात आलेल्या ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सहायिका, पशुधन पर्यवेक्षक व अंगणवाडी पर्यवेक्षक या पाच संवर्गातील कर्मचार्‍यांच्या करण्यात आलेल्या बदल्या स्थगित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी त्या-त्या विभागप्रमुखांना दिले होते. आता याच पेसा कायद्याचा आधार घेत तसेच बदल्यांच्या कार्यवाहीप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी हजर नसल्याची तक्रार काही कर्मचारी संघटनांनी करीत सर्वच कर्मचार्‍यांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी केल्याचे समजते. या मागणीतून सर्व कर्मचार्‍यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्याची चर्चा असली तरी त्यास प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या बदल्यांबाबत जिल्हा परिषदेत संभ्रम आहे. (प्रतिनिधी)