Join us

एकदिवसीय थकबाकी नियम मोडण्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:21 IST

रिझर्व्ह बँकेची तक्रार; बँकांकडून पालन नाही

पुणे : रिझर्व्ह बँकेने केलेल्या एकदिवसीय थकबाकी नियमाचे बँकांकडून सर्रास उल्लंघन होत असून ही बाब चिंताजनक आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन यांनी केले.कुकर्जांचे प्रमाण १० टक्क्यांच्या वर गेल्यानंतर रिझर्व्ह बँकेने १२ फेब्रुवारी रोजी नवी नियमावली जारी केली होती. त्यानुसार, कर्जावरील व्याजाचा भरणा एक दिवस जरी लांबला, तरी संबंधित कर्ज खाते थकबाकीदार म्हणून जाहीर करण्याचे बंधन बँकांना घालण्यात आले आहे. थकीत कर्जावर १८० दिवसांत उपाययोजना करण्याचे बंधनही बँकांना घालण्यात आले आहे.नव्या नियमांचे समर्थनअनुत्पादक भांडवलाविषयीच्या नव्या नियमांचे रिझर्व्ह बँकेने समर्थन केले आहे. एकदिवसीय थकबाकीचा नियम मागे घेण्यासाठी सरकारकडून लॉबिंग केले जात असल्याचे वृत्त असून, या पार्श्वभूमीवर बँकेने नव्या नियमांची पाठराखण केली आहे. बँकेने म्हटले की, कर्ज कराराचे पावित्र्य पुनर्स्थापित करणे गरजेचे आहे. त्यासाठी नियम कठोरच हवेत.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक