Join us

‘कमी वेतनासाठी कंपन्यांची हातमिळवणी’

By admin | Updated: February 23, 2017 00:51 IST

नव्या कर्मचाऱ्यांचे वेतन कमी ठेवण्यासाठी बड्या आयटी कंपन्यांनी हातमिळवणी केली असल्याचा

हैदराबाद : नव्या कर्मचाऱ्यांचे वेतन कमी ठेवण्यासाठी बड्या आयटी कंपन्यांनी हातमिळवणी केली असल्याचा आरोप या क्षेत्रातील ज्येष्ठ जाणकार टी.व्ही. मोहनदास पै यांनी केला आहे. पै यांनी सांगितले की, आयटी कंपन्यांमध्ये नक्कीच समस्या आहेत. भारतीय कंपन्या नव्या कर्मचाऱ्यांना पुरेसे वेतन द्यायला तयार नाहीत. खरे म्हणजे या कर्मचाऱ्यांना जास्त वेतन द्यावे लागू नये म्हणून बड्या कंपन्यांनी हातमिळवणी केली आहे. वेतन वाढवायचे नाही, असे या कंपन्यांनी ठरवून घेतले आहे.वेतनाशी संबंधित वृत्तानुसार दोन दशकांपूर्वी नव्या इंजिनीअर्सना भरती करताच २.२५ लाख रुपयांचे वार्षिक वेतन दिले जात होते. दोन दशकांच्या काळात यात फारच कमी वाढ करण्यात आली. आज नव्या इंजिनीअर्सना ३.५ लाखांचे वार्षिक वेतन दिले जाते. महागाई निर्देशांकाशी जोड घातल्यास इंजिनीअर्सच्या वेतनात घट झाल्याचेच दिसून येईल, असे ते म्हणाले. इन्फोसिसमध्ये १९९४ ते २00६ या काळात मुख्य वित्त अधिकारी असलेले मोहनदास पै म्हणाले की, नव्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवायचे नाही, यासाठी आयटी कंपन्या परस्परांशी बोलतात, ही दु:खदायक बाब आहे. भारतीय आयटी उद्योगासाठी ही काही चांगली बाब नाही. हे बंद झालेच पाहिजे. (वृत्तसंस्था)...तर हुशार मुले आयटीकडे फिरकणार नाहीतमोहनदास पै हे सध्या मणिपाल ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेस आणि आरिन कॅपिटलचे चेअरमन आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, आयटी कंपन्यांनी नव्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करायला हवी. तसेच जुन्या कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करायला हवे. आम्ही वेतन वाढविले नाही, तर बुद्धिमान लोक या क्षेत्रात येणारच नाहीत. सध्या आयटी क्षेत्रात येणारी बहुतांश मुले टीअर-२ महाविद्यालयांतील असतात. ही मुले तैलबुद्धीची असतात, यात शंकाच नाही; पण आम्हाला टीअर-१ दर्जाच्या कॉलेजांतील मुले हवी आहेत. हे फार मोठे आव्हान आहे.