Join us

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या : शिवसेनेची मागणी

By admin | Updated: November 1, 2014 21:48 IST

आजरा : घनसाळसह विविध प्रकारच्या भातावर आजरा तालुक्यात मानमोडी रोग पडला असून, यामुळे भात उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. अशा भात उत्पादक शेतकर्‍यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

याबाबत जिल्हाप्रमुख विजय देवणे व शिवसेना कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार डी. बी. कोळी यांना निवेदन दिले आहे.
आजरा तालुक्यातील भात पिकाला मानमोडी व हुडहुड वादळाने बदललेल्या हवामानाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. त्यामुळे भाताच्या उतार्‍यात प्रचंड घट होणार आहे.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख राजू सावंत, दिनेश कांबळे, अनिल कोरवी, युवराज पोवार, आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
--------------
फोटो ओळ :
आजरा तालुका शिवसेनेच्यावतीने नायब तहसीलदार डी. बी. कोळी यांना निवेदन देताना जिल्हाप्रमुख विजय देवण, संभाजी पाटील व शिवसैनिक उपस्थित होते.
----------
०१ आजरा / एडीटवर