Join us

डॉलरच्या तुलनेत रुपया पोचला ६६.९९ वर, गाठला २ वर्षांचा नीचांक

By admin | Updated: December 4, 2015 12:39 IST

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत सलग तिस-या दिवशी घसरून ६६.९९ वर पोचली असून रुपयाने दोन वर्षांतील नीचांक गाठला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत सलग तिस-या दिवशी घसरली असून रुपयाने दोन वर्षांतील नीचांक गाठला आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात रुपया ३४ पैशांनी घसरून त्याची किंमत ६६.९९ इतकी झाली आहे. 
गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीत सतत घसरण होत आहे. जगातील सर्वच देशांच्या चलनांच्या तुलनेत डॉलर वधारला असून तो साडेबारा वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोचला आहे. त्याचाच परिणाम रुपयावरही झाल्याचे दिसत आहे. 
दरम्यान शेअर बाजारातही घसरण सुरू असून मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २०१.३५ अंकांनी घसरून २५,६८५ वर उघडला.