Join us

कंपन्यांनी दहा महिन्यांत उभे केले ४६ हजार कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2016 00:32 IST

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या १0 महिन्यांत भारतीय कंपन्यांनी प्राथमिक भांडवली बाजारातून ४६ हजार कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे.

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या १0 महिन्यांत भारतीय कंपन्यांनी प्राथमिक भांडवली बाजारातून ४६ हजार कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे. कंपन्यांनी हा निधी प्रामुख्याने आरंभिक सार्वजनिक प्रस्ताव म्हणजेच आयपीओच्या माध्यमातून उभा केला आहे.या आधी २0१४-१५ च्या एप्रिल-जानेवारी या कालावधीत कंपन्यांनी प्राथमिक भांडवली बाजारातून १३,१५८ कोटी रुपयांचा निधी उभा केला होता. भांडवली बाजार नियामक सेबीने यासंबंधीचे आकडे जारी केले आहेत. आपल्या विस्तार योजना, कर्जाचे भुगतान आणि अन्य सामान्य कॉर्पोरेट उद्देशांकरिता हे भांडवल कंपन्यांनी उभे केले आहे. सेबीने म्हटले की, २0१५-१६ या आर्थिक वर्षात प्राथमिक समभाग बाजार सातत्याने नरमाईतून बाहेर येत आहे, असे चित्र दिसले. एकूण आयपीओ प्रस्तावांची प्रक्रिया गतिमान झाली.