नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या १0 महिन्यांत भारतातील विविध कंपन्यांनी प्राथमिक भांडवली बाजारातून ४६ हजार कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे. कंपन्यांनी हा निधी प्रामुख्याने आरंभिक सार्वजनिक प्रस्ताव म्हणजेच आयपीओच्या माध्यमातून उभा केला आहे.या आधी २0१४-१५ च्या एप्रिल-जानेवारी या कालावधीत कंपन्यांनी प्राथमिक भांडवली बाजारातून १३,१५८ कोटी रुपयांचा निधी उभा केला होता. भांडवली बाजार नियामक सेबीने यासंबंधीचे आकडे जारी केले आहेत. आपल्या विस्तार योजना, कर्जाचे भुगतान आणि अन्य सामान्य कॉर्पोरेट उद्देशांकरिता हे भांडवल कंपन्यांनी उभे केले आहे. सेबीने म्हटले की, २0१५-१६ या आर्थिक वर्षात प्राथमिक समभाग बाजार सातत्याने नरमाईतून बाहेर येत आहे, असे चित्र दिसले. एकूण आयपीओ प्रस्तावांची प्रक्रिया गतिमान झाली.झाल्याचे चित्रही दिसून आले. या काळात आयपीओ बरोबरच सार्वजनिक ऋण प्रस्ताव आणि राइटस् इश्यू यांच्या माध्यमातूनही कंपन्यांनी पैसा उभा केला. तथापि, आयपीओची कामगिरी त्यात सर्वाधिक चांगली राहिली.एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्यांच्या कालावधीत जमविण्यात आलेल्या ४६,0१४ कोटी रुपयांपैकी ऋणसाधनांद्वारे जमविण्यात आलेला निधी २४,५५२ कोटी रुपये होता. समभाग प्रस्तावांद्वारे २१,४६२ कोटी रुपये जमविण्यात आले. समभाग बाजारात एकूण ५३ कंपन्यांनी आयपीओ प्रस्ताव सादर केले. त्यातून १२,६७८ कोटी रुपये उभे करण्यात आले. ११ कंपन्यांनी राईट इश्यूच्या माध्यमातून भांडवल उभे केले.
कंपन्यांनी १0 महिन्यांत उभे केले ४६ हजार कोटी रुपये
By admin | Updated: March 25, 2016 02:04 IST