Join us  

जीएसटीसाठी ‘कम्युनिटी’ पूल, निधीसाठीही पोर्टल; लघू उद्योजकांना आॅनलाइन मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:55 AM

जीएसटीअंतर्गत लघू व मध्यम उद्योजक सर्वाधिक संभ्रमात आहेत. त्यांच्यासाठी सीआयआयने विशेष ‘कम्युनिटी’ पूल बांधला आहे. त्याद्वारे त्यांना आॅनलाइन मार्गदर्शन केले जात आहे.

मुंबई : जीएसटीअंतर्गत लघू व मध्यम उद्योजक सर्वाधिक संभ्रमात आहेत. त्यांच्यासाठी सीआयआयने विशेष ‘कम्युनिटी’ पूल बांधला आहे. त्याद्वारे त्यांना आॅनलाइन मार्गदर्शन केले जात आहे.अर्थव्यवस्थेशी निगडित सर्वच क्षेत्रांच्या समान विकासासाठी भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) पश्चिम क्षेत्रांतर्गत विविध सेमिनार्स आयोजित केले जात आहेत. तसेच लघू व मध्यम उद्योग (एसएमई) क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केले आहे. जीएसटीचा विशेष ‘पूल’ त्याचाच भाग आहे.पश्चिम क्षेत्राचे प्रादेशिक संचलाक डॉ. सौगत मुखर्जी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, देशातील ६० टक्के मनुष्यबळ हे लघू व मध्यम उद्योगांत आहे. यामुळेच या क्षेत्राला बूस्ट अप मिळणे गरजेचे आहे. त्यामुळेच सीआयआयने त्यांना जीएसटीसाठी मार्गदर्शन सुरू केले आहे. त्यासाठी विशेष समूह तयार केला असून, त्यात ४८०० लघू व मध्यम उद्योगांचा समावेश आहे. या सर्वांना वेबिनार्स, व्हर्च्युअल गायडन्स आदींच्या माध्यमातून जीएसटीसंबंधी मार्गदर्शन केले जात आहे. एसएमर्इंना जीएसटी मार्गदर्शन देणारे हे पहिले आॅनलाइन पोर्टल आहे.उद्योगांना अशीही मदतएसएमर्इंना मोठी समस्या निधीची असते. निधीच्या तुटीमुळे अनेक लघू उद्योग आजारी होतात. ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ न एसएमर्इंचे विशेष सुविधा पोर्टल तयार केले आहे. सर्व प्रमुख बँका व वित्तीय संस्था या पोर्टलशी संलग्न आहेत. त्याद्वारे एसएमर्इंना तत्काळ कर्जमंजुरी मिळवून दिली जाते, असे मुखर्जी म्हणाले. 

टॅग्स :जीएसटीभारत