Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्युच्युअल फंड विक्रीसाठी समिती

By admin | Updated: December 29, 2014 03:44 IST

म्युच्युअल फंड उद्योगाला नव्याने चालना देण्यासाठी भारतीय रोखे व विनिमय मंडळ अर्थात सेबीने एका तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे.

नवी दिल्ली : म्युच्युअल फंड उद्योगाला नव्याने चालना देण्यासाठी भारतीय रोखे व विनिमय मंडळ अर्थात सेबीने एका तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. ही समिती इंटरनेट मोबाईल यासारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करून म्युच्युअल फंड अर्थात एमएफ उत्पादनांच्या वितरणाचा मार्ग सुचविणार आहे.सूत्रांनी सांगितले की, म्युच्युअल फंडावर सेबीच्या सल्लागार समितीची उपसमिती एमएफ उत्पादनांची पोहोच वाढविण्यासाठी आणि इंटरनेट व मोबाईल यांच्या माध्यमातून विक्री वाढीकरिता विविध पर्याय व उपाययोजना सुचवेल.(लोकमत न्यूज नेटवर्क)