Join us

वाणिज्य: एसबीआयच्या ऑटो एक्स्पोला प्रचंड प्रतिसाद

By admin | Updated: September 26, 2014 21:39 IST

अकोला : भारतीय स्टेट बँक अकोलाद्वारा खास अकोला, वाशिम, बुलडाणा, वाशिमसाठी २६ व २७ ऑक्टोबरदरम्यान दोन दिवसीय एसबीआय ऑटो एक्स्पो २०१४ चे आयोजन मुख्य शाखा परिसर येथे केले आहे. पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

एक्स्पोचे उद्घाटन ज्ञानार्जन केंद्र अकोला सहाय्यक महाप्रबंधक प्रकाश माने यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय सहाय्यक महाप्रबंधक हिरानंद चौधरी होते. वसंत खंडेलवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्य प्रबंधक प्रकाश उपासने व विकास मुकादम तसेच शशीकांत फरकाळे उपस्थित होते. एक्स्पोमध्ये अकोला शहरातील नामांकित कंपन्यांच्या फोरव्हीलर गाड्यांच्या शोरूमचे स्टॉल लावण्यात आले आहे. मारूती हुंड्याई, टाटा, शेवरोले, टोयाटो, महिंद्रा, रेनॉल्ट कंपनी स्टॉल उपलब्ध असून, एसबीआयतर्फे ईएमआय आकारून तात्काळ लोन सुविधा उपलब्ध आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
फोटो:२७सीटीसीएल३३
...