वाणिज्य पा ... दक्षिण मध्य रेल्वे ...
By admin | Updated: July 26, 2015 23:38 IST
फोटो रॅपमध्ये ..
वाणिज्य पा ... दक्षिण मध्य रेल्वे ...
फोटो रॅपमध्ये ..सत्येंद्र कुमार दपूमचे नवे महाव्यवस्थापकनागपूर : सत्येंद्र कुमार यांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून ७ जुलैला पदभार सांभाळला आहे. यापूर्वी ते भारतीय रेल्वे सिग्नल इंजिनिअरिंग आणि दूरसंचार संस्थान (आयआरआयएसईटी) सिकंदराबाद येथे कार्यरत होते. सत्येंद्रकुमार १९७८ बॅचचे भारतीय रेल्वे सिग्नल इंजिनिअरिंग सेवेचे अधिकारी आहेत. रेल्वेत रुजू होण्यापूर्वी त्यांनी इराकमध्ये इंजिनिअर्स प्रोजेक्ट इंडिया याकरिता काम केले आहे. त्यांनी आयआयटीमधून बी.टेक़ पदवी संपादन केली. त्यांनी आपल्या सेवेत रेल्वेचे सियालदाह मंडळ आणि उत्तर पूर्व सीमांत रेल्वेत मंडळ रेल्वे व्यवस्थापक आणि उत्तर रेल्वे व दक्षिण पूर्व रेल्वेत मुख्य सिग्नल इंजिनिअर या पदावर कार्य केले आहे. सहायक सिग्नल व दूरसंचार इंजिनिअर पदावर उत्तर रेल्वेच्या दिल्ली मंडळात कार्य करताना १९८१ मध्ये नवी दिल्ली स्टेशनवर रूट रिले इंटरलॉकिंग (आरआरआय) स्थापन करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यांनी अनेक देशांमध्ये विविध योजनांवर कार्य केले आहे. इंडोनिशिया व बांग्लादेशमध्ये काम केले आहे. भारतीय रेल्वे सिग्नल इंजिनिअरिंग आणि दूरसंचार संस्थान, सिकंदराबादमध्ये संचालक पदावर कार्य करतेवळी सिग्नल आणि टेलिकॉम प्रशिक्षण क्षेत्रात त्यांच्या नेतृत्वात या संस्थानमध्ये अनेक आधुनिक प्रयोग आणि नवीन प्रयोगशाळेची स्थापना केली.