वाणिज्य पा ...३ ...
By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST
वाणिज्य पा ...३ ...
फोटो आहे... रॅपमध्ये ...ज्युपिटर हायस्कूलमध्ये गणतंत्र दिवसनागपूर : ज्युपिटर हायस्कूलमध्ये गणतंत्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव तारिणी निखारे यांनी ध्वजारोहण केले. ज्युपिटर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रकाश मेश्राम, हायस्कूल विभागाच्या उपमुख्याध्यापिका संजीवनी जोशी, प्रमुख अतिथी डॉ. सुरेश शर्मा, नगसेविका उषा लिशिदकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. डॉ. सुरेश शर्मा यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधनपर मार्गदर्शन केले. या दिनानिमित्त समूहगीत स्पर्धा व डबल पीन पाँग पीटी, रिंग पीटी, लेझिम, एरोबिक्स, पिरॅमिड आदी कवायतींचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. संचालन प्रविणा मांडळे यांनी तर वैशाली अघोर यांनी आभार मानले. कवायतीच्या सादरीकरणासाठी ऋतूजा रार्घोते आणि सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.