वाणिज्य पा ...३ ...
By admin | Updated: July 1, 2014 23:55 IST
एलजीच्या वॉटर प्युरिफायरला मागणी
वाणिज्य पा ...३ ...
एलजीच्या वॉटर प्युरिफायरला मागणी नागपूर : एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाने बाजारात दाखल केलेल्या भारतातील पहिल्या ड्युएल प्रोटेक्शन स्टेनलेस स्टील टँक आरओ वॉटर प्युरिफायरला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विक्रीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवीन उत्पादन एलजीच्या घरगुती उत्पादन वर्गवारीत आहे. ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडीनुसार या उद्योगातील पहिल्या स्टील टँक रेंजच्या मागणीत वाढ होत आहे. ग्राहकांना मूल्याच्या बदल्यात गुणवत्तेची उत्पादने हवी असतात. एलजी इंडियाच्या होम अप्लायन्सेसचे विक्री प्रमुख राजीव जैन यांनी सांगितले की, एलजीच्या ट्रू आरओ वॉटर प्युरिफायरच्या विक्रीत दाखलीकरणापासूनच वाढ होत आहे. ट्रू आरओ प्युरिफायरमध्ये हायजेनिक पाणी साठविण्यासाठी असलेल्या अनोख्या ड्युएल प्रोटेक्शन स्टेनलेस स्टील टँकमुळे ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. वॉटर प्युरिफायरच्या नवीन तंत्रज्ञानाने भारतीय ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याचे जैन यांनी सांगितले. यावर्षीच्या अखेरपर्यंत प्रीमियम वर्गवारीत ५० टक्के वाटा मिळविण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. एलजीची नवनवीन उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस नेहमीच खरी उतरली आहेत. शुद्ध आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी हे उत्पादन अनोखे आहे. नवीन उत्पादनाचे डिझाईन ट्रू आरओ फिल्टरेशन सिस्टिमवर आधारित असल्याने शुद्ध आरओ पाणी मिळणे शक्य आहे. स्वतंत्र हवाबंद स्टेनलेस स्टील टँक जीवाणूला प्रतिबंध करते. हे उत्पादन इकोफें्रडली, त्रासरहित आणि स्वतंत्र देखभालीच्या पद्धतीवर आधारित आहे. शेवटच्या थेंबापर्यंत पाणी शुद्ध देणारे हे उत्पादन आहे.