Join us

वाणिज्य प˜ा ...२ ...

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST


फोटो आहे... रॅपमध्ये ...
वेकोलिमध्ये गुणवत्ता पंधरवडा
नागपूर : वेकोलिच्या मुख्यालयात अलीकडेच आयोजित गुणवत्ता पंधरवडा समारोप समारंभात पुरस्कार वितरण करण्यात आले. वेकोलिचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर.आर. मिश्र मुख्य अतिथी तर कोळसा मंत्रालयाचे कोळसा नियंत्रक ए. आचार्य विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. मिश्र यांनी अधिकाऱ्यांना गुणवत्ता कायम ठेवण्याचे आवाहन केले. कोल इंडियावर २०१९-२० पर्यंत हजार दशलक्ष टन कोळसा उत्पादनाची जबाबदारी आहे. त्यात वेकोलिचे किमान ६० दशलक्ष टन योगदान राहील. योग्य प्रमाण आणि उच्च गुणवत्तेचा कोळसा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले. आचार्य यांनी वेकोलितर्फे कोळशाच्या गुणवत्तेसाठी वेकोलिच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. कोळशाच्या गुणवत्तेसाठी माजरी क्षेत्राला प्रथम पुरस्कार, बल्लारपूर क्षेत्राला दुसरा आणि चंद्रपूर क्षेत्राला तिसरा पुरस्कार देण्यात आला. वेकोलिचे तांत्रिक संचालक एस.एस. मल्ही आणि संचालन समितीचे सदस्य एस.एच. बेग यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सीएमपीएफओचे क्षेत्रीय आयुक्त वाय.एस. तुरंग उपस्थित होते. प्रास्तविक महाव्यवस्थापक (गुणवत्ता नियंत्रण) आर.जी. स्वर्णकार यांनी तर मुख्य महाव्यवस्थापक (संचालन) आर.सी. सनोडिया यांनी आभार मानले.