Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य प˜ा ...२ ...

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

फोटो आहे... एच/डेली/२९पीएचओ१२ ....

फोटो आहे... एच/डेली/२९पीएचओ१२ ....
स्वराज पब्लिक स्कूलमध्ये स्नेहसंमेलन
नागपूर : स्वराज पब्लिक स्कूल, वाठोडा येथे स्नेहसंमेलन साजरे करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक प्रा. सचिन काळबांडे होते. प्रमुख अतिथी म्हणून चंद्रकांत सतेजा, सुभाष कोटेचा, समाजसेवक उमेश चौबे, सुनील कोठे, नगरसेवक प्रवीण नरड, दशरथ कांबळे आणि भाजपा व्यापारी आघाडीचे शहरमंत्री विजय अग्रवाल उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य, नकला, गोंधळ, पारंगत नृत्य, कथ्थक, लावणी, इंग्रजी नाटक आदींद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम हा स्त्री अत्याचार व संरक्षण या उद्देशाला धरून राबविण्यात आला. प्रास्तविक प्रा. सचिन काळबांडे यांनी तर संचालन शीतल वरुलकर व जयश्री बेहरे यांनी केले. किशोर सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी नंदा गुमगांवकर, मंगला भागवतकर, पूनम तारसेकर, नंदा सोमकुवर, आरती पाटील, हिनाली मेश्राम, चेतन घुले, मंगेश पौनीकर, पल्लवी साहारे, रूपाली सोनपिंपळे, पूजा पायघन, नीलिमा सेंगर, रेखा ठवकर, सुचिता खोब्रागडे, किशोर सोनवणे, राजेश निंबाळकर, तुषार लाकडे यांनी परिश्रम घेतले.