Join us

वाणिज्य प˜ा ...२ ...

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

कॅनरा बँकेचा रिटेल एक्स्पो आजपासून

कॅनरा बँकेचा रिटेल एक्स्पो आजपासून
नागपूर : कॅनरा बँक, नागपूर क्षेत्रातर्फे दोन दिवसीय रिटेल एक्स्पोचे आयोजन रविवार, २१ डिसेंबरपासून आकाशवाणी चौकातील गोंडवाना लॉन येथे होणार आहे. शहरातील प्रतिष्ठित बिल्डर्स आणि कार डिलर्स आपली उत्पादने सादर करणार आहेत. कॅनरा बँकेने कर्ज प्रकरणांमध्ये शीघ्र वितरणाची सुविधा प्रदान करताना जागेवरच अनुमोदन प्रदान करण्याची घोषणा केली आहे. बँकेतर्फे निवास आणि कार कर्जाअंतर्गत शून्य प्रोसेसिंग शुल्काची आकर्षक सुविधा प्रदान करण्यात येईल. रिटेल एक्स्पोमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली कॅनरा बँकेची विविध उत्पादनांमध्ये जमा ते कर्जापर्यंत, म्युच्युअल फंड ते बँक इन्शुरन्स आणि हेल्थ विमा योजनांसह नवनवीन तंत्रज्ञानाच्या उत्पादनांची विस्तृत रेंज प्रदान करण्यात येणार ओह. ग्राहकांच्या बहुस्तरीय मागण्या पूर्ण करण्यासाठी निवास व कार कर्ज योजनांव्यतिरिक्त आकर्षक टॅक्स सेव्हिंग उत्पादने प्रदर्शित केली जातील.

फोटो आहे... रॅपमध्ये ....
इरोज ह्युंडईची डिसेंबर योजना
नागपूर : पुढील वर्षात ह्युंडई कारच्या किमती वाढण्याआधीच डिसेंबरमध्ये खरेदीचे आवाहन घाट रोड येथील इरोज ह्युंडईने केले आहे. शोरूमने डिसेंबरमध्ये आयोजित केलेल्या विशेष योजनेत १०० टक्के ऑनरोड फंडिंग आणि केवळ एक रुपया डाऊन पेमेंटमध्ये कार खरेदीची संधी आहे. याशिवाय ह्युंडई कारच्या संपूर्ण रेंजवर आर्थिक बचतीच्या योजना आहेत. इयॉन, ग्रॅण्ड आणि एक्सेंट, आय १० आणि वर्ना कार बचतीच्या योजनांसह आहे. याशिवाय एक्स्चेंज योजनेत जुन्या कारच्या बदल्यात नवीन कार खरेदीची संधी असून एक्स्चेंज बोनस देण्यात येत आहे. कार ऑफ द इअर हा पुरस्कार जिंकलेली आय२० कार टेस्ट ड्राईव्हसाठी शोरूममध्ये प्रदर्शित केली आहे. ग्रामीण भागातील ग्राहक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक फायदे मिळणार आहेत. इरोज ह्युंडईच्या वतीने रविवार, २१ डिसेंबरला लोन कम एक्स्चेंज मेळाव्याचे आयोजन खामला चौक, गुलमोहर सभागृहात केले आहे.