Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य प˜ा ...१ ...

By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST

फोटो आहे... रॅपमध्ये ... बातमी १२ बाय २ ...

फोटो आहे... रॅपमध्ये ... बातमी १२ बाय २ ...
विजेत्याला कारच्या चाव्या प्रदान
नागपूर : बजाज फिनसर्व्हने दिवाळी-२०१४ मध्ये तीन महिन्यांपर्यंत संपूर्ण देशात राबविलेल्या विशेष स्पर्धेतील विजेत्यांना राष्ट्रीय स्तरावर वर्गवारीनुसार ६ कार, २२ युरोप ट्रीप, ३७ व्हेस्पा स्कूटर, ४०७ आयफोन आदींसह एकूण ४६८ पुरस्कार वितरित करण्यात आले. या स्पर्धेत नागपुरात नऊ ग्राहकांना पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये कार, व्हेस्पा, पाच आयफोन, १० हजारांचे दोन कॅशबॅक आदींचा समावेश आहे. याशिवाय अन्य १०० ते हजार कॅशबॅक ऑफरचा फायदा २४०० जणांना मिळाला आहे. पण ह्युंडई आय१० कारचे विजेते ए.के. गांधी इलेक्ट्रॉनिक्स स्टोअरचे ग्राहक ठरले आहे. ही उपलब्धी अशोककुमार गांधी आणि यश गांधी यांच्यामुळे शक्य झाली आहे. ही दोन्ही नावे नागपुरात नव्हे तर संपूर्ण विदर्भात ख्यातिप्राप्त आहेत. ए.के. गांधी फर्मतर्फे ग्राहकांना गेल्या ४० वर्षांपासून सर्वोत्तम सेवा देण्यात येत आहे. विश्वास आणि संतुष्टीसाठी हे प्रतिष्ठान ओळखले जाते. ए.के. गांधी फर्मने आपल्या बॅनरअंतर्गत लकी ड्रॉ स्कीम राबविली. या अंतर्गत गेल्या वर्षी भाग्यशाली विजेत्याला दोन टाटा नॅनो कार प्रदान करण्यात आल्या. हीच परंपरा कायम ठेवताना ए.के. गांधी इलेक्ट्रॉनिक्सने विजेत्याला ह्युंडई आय१० कारच्या चाव्या दिल्या. बाजारपेठेत फायनान्समध्ये बजाज फिनसर्व्ह हे नाव पारदर्शक व्यवहार आणि विश्वासासाठी घेतले जाते. या कंपनीने दिवाळीत राबविलेल्या स्पर्धेच्या सोडतीचा विशेष कार्यक्रम ११ फेब्रुवारीला वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये घेतला. यावेळी मेरी सोईना टिटोज प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय कारप्राप्त ग्राहकही हजर होते. विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी बजाज फिनसर्व्हचे नॅशनल हेड रोहित लोहिया, झोनल हेड सौरभ शर्मा, रिजनल हेड प्रिया स्वरूप आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. स्वप्नपूर्ती झालेले ग्राहक आनंदी होते. या विशेष समारंभाने बजाज फिनसर्व्ह आणि ग्राहकांचे संबंध अधिक दृढ झाले.