Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य: सायन्स क्लबचा पुष्कर लोहिया राज्यात पहिला

By admin | Updated: June 20, 2014 21:24 IST

अकोला : २० वर्षांपासून शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यातून अव्वल येण्याची सायन्स क्लबची परंपरा पुष्कर लोहिया याने कायम राखली. महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत २०० पैकी १७८ गुण घेऊन पुष्करने राज्यात पहिले स्थान पटकाविले.

दहावी एनटीएसईमध्ये मेरिट येण्याचा मान ऋषिकेश इचे, निखिल जाधव, अपूर्व पडघन यांनी प्राप्त केला. नववी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यातून मेरिट येण्याचा मान ओम गवई, चैतन्य साखरे, आशय वाकोडे, भूषण अग्रवाल यांनी पटकाविला. जिल्‘ात मेरिट येण्याचा मान राहुल राठोड, राघव खंडेलवाल, दीप मालू, शर्व पाटील, यश कासट, अक्षय कोरडिया, वेदिका राठी, खुशबू अग्रवाल, तितिक्षा अंधारे, विराज तेलकर, अनिकेत जाधव, आदेश इंगळे, संकेत कोल्हे, राज काटे, विदित लोहिया, तेजस पाथ्रीकर, रोशन भटकर यांनी मिळविला. आठवीमध्ये राज्यातून मेरिट येण्याचा मान राही रघुवंशी, नकुल रांदड, ध्रुव लहरिया, कपिल चांडक यांनी मिळविला. शिवम गवई, अनिकेत टाले, किरण देशमुख, साक्षी देवकर, शिवम रांदड, सायली कुळकर्णी, नीरज डाबरे, अनिश धनखोदे, श्रेयश काळे, श्रेयश चांडक, बिंदव जोशी यांनी जिल्‘ात मेरिट येण्याचा मान मिळविला. (वाणिज्य प्रतिनिधी)
फोटो:२१सीटीसीएल११
...