Join us

वाणिज्य प˜ा .... एम्ब्रोशिया ...

By admin | Updated: August 3, 2015 22:31 IST

फोटो रॅपमध्ये ...

फोटो रॅपमध्ये ...
एम्ब्रोशिया रिसोर्टला उत्तम प्रतिसाद
नागपूर : आता सामान्य नागरिकही फॉर्म खरेदीचे स्वप्न पूर्ण करू शकतो. ग्राहकांच्या स्वप्नपूर्तीसाठी श्रीराम वास्तू इन्फ्रा प्रा.लि.चे संचालक नरेश पौनीकर यांनी एम्ब्रोशिया नावाने फार्म हाऊसचा प्रकल्प नागपूर-काटोल मार्गावर ३९ कि़मी. अंतरावर सोनमोह येथे तलावाच्या काठावर आणि नैसर्गिक व शांत वातावरणात आणला आहे. १ ते १० हजार चौ.फूट आकाराचे प्लॉट आहेत. अतिशय किफायत दरात खरेदीची संधी असून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काहीच युनिट उरले आहेत. कंपनीचे कार्यालय झेन एनक्लेव्ह, कॅनरा बँक, रेसिडेन्सी रोड येथे आहे. त्वरित ताबा देण्यात येत असून येथील सोयीसुविधांचा ग्राहकांना फायदा घेता येईल. पौनीकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, प्रकल्प आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे. बगीचा, मंदिर, क्लब हाऊस, स्विमिंग पूल, कॅफेटेरिया, क्रिकेट व फूटबॉल मैदान, जॉगिंग ट्रॅक, जिम्नॅशियम, पार्टी लॉन, आकर्षक प्रवेशद्वार, मचान व झोपडी, २४ तास सुरक्षा, पॉवर बॅकअप, स्ट्रीट लाईट, वॉटर टँक, सुरक्षा भिंत, फळांच्या झाडांची लागवड, देखभालीसाठी कर्मचारी, हॉर्स रायडिंग आदी सुविधा उपलब्ध आहेत. ५० टक्के रक्कम भरून रजिस्ट्री करता येईल. उर्वरित रक्कम सहा महिन्यात द्यायची आहे. हा प्रकल्प एनएटीपी मान्यताप्राप्त आहे.

फोटो रॅपमध्ये ...
बीओआयतर्फे एकदिवसीय कार्यशाळा
नागपूर : बँक ऑफ इंडियाच्या विदर्भ क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. विदर्भातील शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नागपूर क्षेत्रीय व्यवस्थापक रमेश कदम यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. कदम म्हणाले, हिंदी आमची राष्ट्रभाषा आणि राजभाषा आहे. हिंदी सरळसोपी भाषा असून संपूर्ण भारताला जोडणारी भाषा आहे. मानक हिंदीचा उपयोग करावा. बँकिंग कार्यात भारत सरकारचे राजभाषा धोरण आणि वार्षिक कार्यक्रमांचे लक्ष कायम ठेवावे. युनिकोड आणि हिंदीचा जास्तीतजास्त उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी कॅनरा बँकेचे राजभाषा अधिकारी अंबरिश वर्मा, बँक ऑफ इंडियाचे माजी आयटी अधिकारी अशोककुमार गांधी, बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी रमेश साखरे गच्छी, उपक्षेत्रीय व्यवस्थापक अरविंदकुमार शर्मा उपस्थित होते. उपस्थितांनी बँकिंग क्षेत्रात हिंदी भाषेचा अवलंब करण्याचे आवाहन केले. रमेश साखरे गच्छी यांनी आभार मानले तर कार्यशाळेच्या आयोजनात संजय मुंडले यांनी सहकार्य केले.