Join us

वाणिज्य प˜ा ...

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST

फोटो रॅपमध्ये ...

फोटो रॅपमध्ये ...
युनिक स्लीम पाईंटमध्ये नवीन मशीन
नागपूर : युनिक स्लीम पाईंट ॲण्ड ब्यूटी क्लिनिक, गांधीबाग व लोकमत चौक येथे वेट लॉसच्या दोन नवीन मशीन आणल्या आहेत. गेल्या १६ वर्षांपासून नवीन तंत्रज्ञानाने वेटलॉस आणि इंचलॉस उपचार देण्यात येते. गेल्या पाच वर्षांपासून वेट लॉस क्लिनिक महाराष्ट्रचा पुरस्कार युनिक स्लीम पॉईंटला मिळत आहे. सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. रिचा जैन यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय मशीन तंत्रज्ञानाने अद्ययावत उपचार करण्यात येतात. जर्मन मशीन, कॉम्युटराईज्ड स्लिमिंग मशीन, सेलोलाईट मशीन, इंटरनॅशनल इंच लॉस लेझर, डॉईड, लायपो लेजर, पॉवर बॉडी स्लिमर आदी उपचार देण्यात येतात. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देताना युनिक स्लीम पॉईंटच्या टार्क प्लस व अल्ट्रा साऊंड रेडिओ लायपो मशीनद्वारे वेट लॉस आणि इंच लॉस हे दोन्ही उपचार एकाचवेळी करता येते. त्यामुळे वेळेची बचत होते. शरीराच्या सर्व भागांवरही एकाचवेळी उपचार करता येते. यासह येथे रेडिओ लायपो मशीन दाखल केली आहे. यामध्ये तीन मशीनचे काम एकाचवेळी करता येते. येथे वजन कमी करण्यासाठी जागतिक दर्जाच्या मशीन्स उपलब्ध आहेत. यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाही वा औषधी व इंजेक्शन देण्यात येत नाहीत. पाच सिटिंगवर पाच सिटिंग मोफत देण्यात येत आहे.

विमलादेवी डॉ. लक्ष्मीनारायण शाळेत रक्षाबंधन
नागपूर : आदर्श विद्या मंदिर संस्थेतर्फे संचालित श्रीमती विमलादेवी डॉ. लक्ष्मीनारायण शाळेत रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला. सरस्वती वंदना आणि गायनानंतर विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधली. शाळेच्या प्राचार्या सुषमा शर्मा यांनी विद्यार्थ्यांना कृष्ण-सुभद्रा राखीच्या नात्याचे महत्त्व समजावून सांगितले. याप्रकारे भाऊ-बहिणीच्या नात्याचा हा उत्सव हर्षोल्हासात साजरा झाला. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.