Join us  

यंदा व्यापार संतुलन चांगले राहणार : गोयल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 11:27 PM

देशातील उद्योग आणि व्यापार क्षेत्राला यामुळे चांगले दिवस येण्याची शक्यता केंद्रिय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली : देशाची निर्यात वाढत असून, आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे यावर्षी देशाच्या आयात निर्यात व्यापारामधील संतुलन चांगले राहण्याचे संकेत मिळत आहेत. देशातील उद्योग आणि व्यापार क्षेत्राला यामुळे चांगले दिवस येण्याची शक्यता केंद्रिय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केली.फिक्की या व्यापारी संघटनेतर्फे आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये बोलताना गोयल यांनी वरील माहिती दिली. चालू वर्षात देशात मोठ्या कालखंडानंतर आयात कमी झालेली दिसून येत असल्याचे गोयल यांनी नमूद केले. याचा परिणाम म्हणून १८ वर्षांनंतर देशाच्या आयात निर्यात व्यापारात देश अधिक बाजूकडे झुकल्याचे त्यांनी नमूद केले.मागील वर्षीच्या जुलै महिन्यात झालेल्या निर्यातीच्या सुमारे ९१ टक्के स्तरापर्यंत आपण यावर्षीच्या जुलै महिन्यात पोहोचलो असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले. याचवेळी देशाची आयात मात्र मागील वर्षाच्या जुलै महिन्याच्या तुलनेत ७० ते ७१ टक्के राहिली आहे. यामुळे आयात निर्यात व्यापारातील तूट कमी होऊन आपण वृद्धीच्या बाजूने झुकत आहोत. यामुळे देशातील उद्योग क्षेत्राला वाढीकडे जाण्याला अधिक गती मिळण्याची अपेक्षा वाटत असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.जून महिन्यात निर्यातीमध्ये झाली घटचालू वर्षाच्या जून महिन्यात निर्यातीमध्ये सलग चौथ्या महिन्यात घट झाली आहे. पेट्रोलियम तसेच कापडाच्या निर्यातीत झालेली मोठी घट चिंता वाढविणारी असली तरी देशाची आयातही या काळात ४७.५९ टक्क्यांनी कमी झाली आहे ही समाधानाची बाब होय.

टॅग्स :पीयुष गोयल