Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य वृत्त १

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

पूर्ती सुपर बाजारमध्ये तांदूळ महोत्सव

पूर्ती सुपर बाजारमध्ये तांदूळ महोत्सव
नागपूर : नागपुरातील सर्वात मोठा आणि उत्तम गुणवत्तेकरिता प्रसिद्ध असणाऱ्या पूर्ती सुपर बाजारमध्ये तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव २८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. सुपर बाजारच्या शृंखलेत लोकप्रिय आणि विश्वासपात्र असणाऱ्या पूर्ती सुपर बाजारचे अनोखे महोत्सवही लोकप्रिय आहेत. त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. यंदाही पूर्तीतर्फे तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला असून यात नव्या व जुन्या ३५ प्रकारच्या तांदळाचा समावेश करण्यात आला आहे. यात बासमती, दावत, सुपर दुबार, तिबार, क्लासिक, रोजाना, ब्रोकन, कोहिनूर, चारमिनार, जय श्रीराम, प्रभाकर हिरा, एचएमटी, आंबेमोहर, चिन्नोर, कालीमुंछ, महाराजा आदी विविध प्रकार येथे उपलब्ध आहे. याशिवाय बिर्याणी तांदूळ, पुलाव तांदूळ, खीर, दोसा, इडली आदी पदार्थांसाठी उपयोगात येणारा विशेष तांदूळ येथे उपलब्ध आहे. सामान्य ग्राहकांना परवडतील अशा पॅकमध्ये येथे तांदूळ उपलब्ध आहे. तूर डाळीचेही विविध प्रकार प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. यात वर्ल्ड कप, ऑरेंज सिटी आदी प्रकार आहेत. उत्कृष्ट गुणवत्ता आणि मालाचे योग्य वजन यात कुठेही तडजोड स्वीकारली जात नाही. स्वच्छ किराणा, निवडलेले धान्य, नामांकित कंपन्यांची दर्जेदार उत्पादने देण्यासाठी पूर्ती प्रसिद्ध आहे. पूर्तीच्या या तांदूळ महोत्सवाला सर्व ग्राहकांनी भेट द्यावी, असे आवाहन पूर्ती बाजारचे अध्यक्ष रवींद्र बोरटकर यांनी केले आहे. पत्र परिषदेला सचिव राजीव हडप, दीपक सप्तर्षी, पूर्तीचे सर्व संचालक, महाव्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते.