Join us

वाणिज्य: अशोक लेलॅण्डच्या दोस्त स्ट्राँगचे अकोल्यात सादरीकरण

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST

अकोला: मजबुती आणि मायलेज त्याचबरोबर जास्ती भार उचलण्याच्या क्षमतेत आघाडीवर असणार्‍या अशोक लेलॅण्डने पिकअप श्रेणीतील नवीन वाहन दोस्त स्ट्राँग आज अकोल्यात सादर केले. पिकअप ट्रक श्रेणीमध्ये दोस्त स्ट्राँगचे ॲव्हरेज १९.६ आहे. अशोक लेलॅण्डचे एरिया सर्व्हीस मॅनेजर किरण मोरे यांनी दोस्त स्ट्राँगची माहिती देताना, याआधी अशाच मॉडलमध्ये जाणवत असलेल्या त्रुटी या मॉडलमध्ये दूर करण्यात आल्या असून, अन्य पिकअप ट्रकच्या तुलनेत दोस्त स्ट्राँगची भार उचलण्याची क्षमता जास्त असल्याचे सांगितले. मजबूती सोबतच आरामदायक आसन व पॉवर स्टेअरिंगमुळे ड्रायव्हिंगसाठी सुलभ झाले आहे. इतर पिकअपच्या तुलनेत दोस्त स्ट्राँगमुळे जवळपास रुपये १,८०,००० ची वार्षिक इंधन बचत सहज होत असल्याचेही सांगितले.

आप ॲाटोव्हिल्सचे मॅनेजर डायरेक्टर परवेझ हुसैन यांनी उपस्थित वित्तीय संस्थाचे प्रतिनिधी व ग्राहकांचे स्वागत केले. कार्यक्रमाला रवी चावला, सुमेध तायडे, मंगेश तायडे उपस्थित होते.(वाणिज्य प्रतिनिधी)
फोटो:१३सीटीसीएल१८
...