Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य प˜ा ...२ ....

By admin | Updated: July 1, 2014 23:55 IST

फोटो आहे... एच/डेली/आर्य कार्स ....

फोटो आहे... एच/डेली/आर्य कार्स ....
आर्य कार्सतर्फे आर्य दिवस साजरा
नागपूर : आर्य कार्सतर्फे वार्षिक पुरस्कार वितरण समारंभाने आर्य दिवस नुकताच साजरा करण्यात आला. हा दिवस दरवर्षी आर्य विशाल बरबटे याच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा करण्यात येतो. आर्य कार्सच्या व्यवस्थापनातर्फे कर्मचाऱ्यांना वर्षभरातील कामगिरीच्या आधारे ट्रॉफी, रोख आणि पदोन्नती देण्यात येते. कार्यक्रमाचा प्रारंभ वृक्षारोपण आणि हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराने झाला. सायंकाळचा कार्यक्रम लांबा सेलेब्रेशनमध्ये आरजे राजन यांच्या उपस्थितीत पार पडला. नृत्यम डान्स अकॅडमीच्या सदस्यांनी नृत्य सादर केले. नामांकित मिमिक्री अजाझ खान यांनी सादरीकरण केले. विशाल बरबटे यांनी २०१२-१३ मध्ये नवीन कार विक्रीत झालेली वाढ, शिवाय ॲसेसरीज आणि सुट्या भागांची विक्री, बॉडी शॉप लोडसोबत वर्कशॉप आदींच्या कामगिरीसाठी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. अशीच कामगिरी पुढील वर्षीही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. २०१३-१४ या वर्षासाठी शोरूमला मिळालेल्या प्लॅटिनम ब्रॅण्डबद्दल चमूचे अभिनंदन केले. उत्कृष्ट व्यवस्थापक पुरस्कार बॉडीशॉप व्यवस्थापक गुरमितसिंग बाब्राह, विभागीय प्रशासकीय व्यवस्थापक आशिष बुऱ्हणकर, विभागीय विक्री व्यवस्थापक महेश वानखेडे, महाव्यवस्थापक (सेवा) विपीनसिंग गुजर यांना देण्यात आला. यावेळी गंगाधरराव बरबटे, विशाल बरबटे, नीलेश बरबटे, सतीश बरबटे, शिरीष हारोडे, शैलेश हारोडे, रावसाहेब चिथोर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आशिष बुऱ्हणकर, शाहीन हुसेन, हेमंत लाडूकर, राजू गाडे, प्रशांत दुबे आणि अंकुश पाटील यांनी परिश्रम घेतले. विशाल, नीलेश, सतीश बरबटे आणि सीईओ चिराग बक्षी यांनी पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.